लॉकडाऊनची सिंधुदुर्ग जिल्ह्यात ही आहे नवीन नियमावली
PRESS MEDIA LIVE. : गणेश राऊळ.
*मिशन बिगीन अगेन अंतर्गत पुढील प्रमाणे सेवा, अटी व शर्तींसह नियमांचे पालन करून सुरू राहणार आहेत.*
• यापूर्वी परवानगी देण्यात आलेली दुकाने, सेवेची ठिकाणे सुरू राहणार आहेत.
• जिल्ह्याअंतर्गत बससेवा जास्तीत जास्त ५० टक्के क्षमतेने, सामाजिक अंतर, निर्जंतुकीकरण व स्वच्छता विषयक उपाययोजना याच्या अधिन राहून सुरू राहतील.
• जिल्हा बंदी कायम असून एका जिल्ह्यातून दुसऱ्या जिल्ह्यात जाण्यासाठी पूर्वी प्रमाणेच निर्बंध लागू राहतील.
• जिल्ह्यातील बाजारपेठा, दुकाने सकाळी ९ ते सायं. ७ या कालावधीत सुरू राहतील.
• मॉल आणि व्यापारी संकुले दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजीपासून सकाळी ९ ते सायं. ७ वा. पर्यंत सुरू राहतील. यामध्ये नाट्यगृहे, प्रेक्षागृहे (थेअटर्स) फुड कोर्ट व उपहारगृहे यांचा समावेश नाही. तथापी मॉलमधील उपहार गृहातील स्वयंपाकगृह फक्त घरपोच सेवेसाठी सुरू राहील. या बाबत संबंधीत स्थानिक स्वराज्य संस्थेने लागू केलेले नियम व अटी लागू राहतील.
• लग्न समारंभ, खुली जागा, लॉन, वातानुकुलीत नसलेले हॉल २३ जूनला निर्बंधासह चालू राहतील.
• मोकळ्या मैदानावरील व्यायाम निर्बंधासह सुरू राहतील.
• वर्तमान पत्राची छपाई, वितरण हे घरपोच सेवेसह सुरू राहील.
• शैक्षणिक संस्थांची कार्यालये, कर्मचारी ( विद्यापीठे, महाविद्यालय, शाळा) शिकविण्याव्यतिरिक्त अशैक्षणिक कामकाज जसे ई-साहित्याचा विकास, उत्तपत्रिकाची मुल्यांकन, निकालाची घोषणा यासाठी सुरू राहतील.
• सलुन, ब्युटीपार्लस, स्पा दुकाने राज्य शासनाच्या २५ जून २०२० च्या आदेशाप्रमाणे सुरू राहतील.
• गोल्फ कोर्स, आऊड डोअर फायरिंग रेंज, जिमनॅस्टिक, टेनिस, मैदानी बॅडमिंटन व मल्लखांब या सारख्या मैदानी खेळांना दिनांक ५ ऑगस्ट २०२० रोजी पासून समाजिक अंतर, निर्जंतुकीकरण याच्या अधिन राहून सुरू राहतील. मात्र जलतरण तलाव चालविण्यास परवनागी असणार नाही.
*नागरिकांच्या हालचाली पुढील प्रमाणे प्रवाशी सलवतीनुसार सुरू राहतील.*
• दुचाकीवर दोन व्यक्ती मास्क व हेल्मेट सह, तीन चाकीमध्ये तीन व्यक्ती व चार चाकी वाहनामध्ये चार व्यक्ती प्रवास करू शकतील.
• सार्वजनिक ठिकाणी, कामाच्या ठिकाणी, प्रवासा दरम्यान मास्क वापरणे बंधनकारक आहे.
• सार्वजनिक ठिकाणी दोन व्यक्तीमधील अंतर किमान ६ फूट ठेवावे.
• दुकानात ग्राहकांची संख्या एकावेळी ५ पेक्षा जास्त असणार नाही व योग्य त्या सामाजिक अंतराचे पालन केले जाईल याबाबतची संपूर्ण जबाबदारी संबंधीत दुकानदार व आस्थापना चालक यांची असणार आहे.
• गर्दी होणारे कोणतेही कार्यक्रम करणे, संमेलन, मेळावे, परिषद इ. यांना बंदी राहील.
• विवाहासारख्या सार्वजनिक कार्यक्रमात सामाजिक अंतर ठेऊन ५० पेक्षा जास्त व्यक्तींना उपस्थित राहण्यास परवानगी नसेल.
• अंत्यविधीसाठी २० पेक्षा जास्त व्यक्तींना परवानगी असणार नाही.
• सार्वजनिक ठिकाणी व कामाच्या ठिकाणी थुंकन्यास बंदी असून त्यासाठी एक हजार रुपये दंड आकारण्यात येईल. सार्वजनिक ठिकाणी पान, तंबाखू, गुटखा, मद्य, धुम्रपान करण्यास मनाई आहे.
• शक्य असेल तिथे वर्क फ्रॉम होम करावे. कामाच्या ठिकाणी, कार्यालय, दुकाने, बाजारपेठा व औद्यौगिक व व्यावसायिक अस्थापना येथे कामाच्या वेळेत योग्य ते अंतर ठेवावे, जेणे करून गर्दी होणार नाही.
• सर्व प्रवेश व निर्गम स्थानावर थर्मल स्कॅनिंग, सॅनिटायझर व हात धुण्याची सुविधा उपलब्ध करावी. कामाच्या ठिकाणी पुरेशा प्रमाणात सॅनिटायझर, हॅन्डवॉश उपलब्ध करुन देण्यात यावेत.
• सर्व कामाच्या ठिकाणाचे सार्वजनिक सुविधाचे आणि मानवी संपर्कात येणाऱ्या सर्व ठिकाणाचे दोन वेळा निर्जंतुकीकरण करावे. कामाच्या ठिकाणी सामाजिक अंतर पाळले जाईल याची दक्षता घ्यावी.
• *कंटेन्मेंट झोनमध्ये शिथील करण्यात आलेले नियम लागू राहणार नाहीत* .
वरील सर्व बाबी तसेच यापूर्वीच्या आदेशाने परवानगी देण्यात आलेल्या बाबी वगळता इतर सर्व बाबी प्रतिबंधीत राहणार आहेत. या आदेशाचे पालन न केल्यास भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ व साथरोग नियंत्रण कायद्यातील तरतुदीप्रमाणे फौजदारी कारवाई करण्यात येईल असे आदेश जिल्हाधिकारी के. मंजुलक्ष्मी यांनी दिले आहेत.