शिरोळ तालुका : शिरढोण मध्ये कोरोना मुळे एकाचा मृत्यू.


शिरढोण मध्ये कोरोनामुळे एकाचा मृत्यू . गावात  एकच खळबळ.

PRESS MEDIA LIVE  :  शिरढोण :

शिरढोण तालुका शिरोळ येथील 80 वर्षे वृद्धाचा कोरोनामुळे इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय इचलकरंजी येथे उपचारादरम्यान मृत्यू झाल्याने गावात एकच खळबळ उडाली आहे. कोरोनाचा गावातील हा पहिला बळी घेतला आहे.

80 वर्षीय वृद्धाला चार दिवसापूर्वी श्वास घेण्यास त्रास होऊ लागल्याने त्याला इचलकरंजी येथील इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय येथे उपचाराकरिता दाखल करण्यात आले होते. मात्र त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. गावामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने नागरिकांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे. त्यामध्ये एकूण दहा बाधितांची संख्या असून त्यापैकी चार जणांचा उपचार घेऊन बरे झाले आहेत. तर पाच जणांवर उपचार सुरु आहे.

Post a Comment

Previous Post Next Post