पुणे. दोन दिवसीय राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्स ला चांगला प्रतिसाद.

 दोन दिवसीय राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्सला चांगला प्रतिसाद

PRESS MEDIA LIVE : पुणे  :

महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर (आझम कॅम्पस )आणि इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ आर्किटेक्ट्स (पुणे चॅप्टर ) यांच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या  दोन दिवसीय राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्स ला चांगला प्रतिसाद मिळाला. ७ आणि ८ ऑगस्ट 2020 रोजी  पुण्यात ही दोन दिवसीय राष्ट्रीय आर्किटेक्चर कॉन्फरन्स ऑनलाईन स्वरूपात गुगल मीट माध्यमातून आयोजित करण्यात आली.  देशभरातून संशोधक ,प्राध्यापक ,विद्यार्थी सहभागी झाले. ' इम्पिरिकल थिअरीज इन  आर्किटेक्चर,प्लानिंग एंड  कंसट्रक्शन  मॅनेजमेंट' हा या परिषदेचा विषय होता.आर्किटेक्चर क्षेत्रातील नवीन संकल्पनांची देवाण घेवाण या परिषदेत करण्यात आली.  

'अल्लाना कॉलेज ऑफ आर्किटेक्चर'च्या प्राचार्य डॉ लीना देबनाथ यांनी उदघाटन केले. इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ आर्किटेक्ट्स चे माजी अध्यक्ष प्रकाश देशमुख हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले . प्रा. डॉ पराग नारखेडे यांनी बीज भाषण केले . दुसऱ्या दिवशी कॉऊन्सिल ऑफ आर्किटेक्ट चे अध्यक्ष हबीब खान हे प्रमुख पाहुणे म्हणून सहभागी झाले तर इंडियन इन्स्टिट्यूट्स ऑफ आर्किटेक्ट्स (पुणे चॅप्टर ) च्या अध्यक्ष जयश्री देशपांडे यांनी मार्गदर्शन केले .   महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी चे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष आबेदा इनामदार यांनी परिषदेला शुभेच्छा दिल्या . पदवीपूर्व आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांनी संशोधनपर निबंध सादर केले.                                                                                                                                                                                           

Post a Comment

Previous Post Next Post