पुणे डॉक्टर, शासकीय कर्मचारी, पोलिसाना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी.

डॉक्टर,शासकीय कर्मचारी ,पोलिसांना राख्या बांधून राखी पौर्णिमा साजरी



  
PRESS MEDIA LIVE :.  पुणे  :
 
कोरोना काळात जीव धोक्यात घालुन आपले कर्तव्य बजावणाऱ्या  पोलीस अधिकारी , कर्मचारी ,पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक , मुकादम ,डाॅक्टर व  सेवाभावी संस्थांचे सदस्य यांना रक्षाबंधनाचे निमित्ताने भाजपच्या महिला पदाधिकारी यांनी राखी बांधुन त्यांचे बद्दल कृतज्ञता व्यक्त केली तसेच त्यांचा यथोचित सन्मान केला . भाजपचे  स्वीकृत सभासद सचिन दांगट यांचे नेतृत्वाखाली वारजे माळवाडी परिसरातील हा उपक्रम यशस्वी झाला .  

   कार्यक्रमास भारतीय मजदुर संघाचे प्रकाश आळंदकर , वारजे माळवाडी पोलीस स्टेशनचे वरीष्ठ पोलीस निरीक्षक मच्छिंद्र पंडीत,स्टेशनचे कर्मचारी , वारजे वाहतुक विभागाचे पोलीस निरीक्षक किरण लोंढे यांचेसह वाहतुक कर्मचारी , पुणे महानगरपालिका आरोग्य निरीक्षक ऋतुराज दिक्षीत , सचिन सावंत , मुकादम संतोष बराटे ,रेणुका मोरे , वर्षा पवार , रेश्मा दोशी , सुप्रिया निंबाळकर , अमजद अन्सारी , किरण साबळे आदि पदाधिकारी उपस्थित होते .  

'कोरोना,कोवीड १९ या महामारीने संपुर्ण जगाला वेठीस धरले आहे . या काळात शासनाने घालुन दिलेले नियम पालन  जनतेकडून करून घेण्यासाठी ज्यांनी आपल्या कुटुंबाचा  , आपला सगळा वेळ देऊन सेवा केली आहे ,त्यांची कृतज्ञता म्हणून हा उपक्रम आयोजित केल्याची माहिती सचिन दांगट यांनी यावेळी दिली . 

Post a Comment

Previous Post Next Post