राष्ट्रीय क्रीडा दिनी आझम कॅम्पस मध्ये.
क्रीडा संस्कृती जपण्याची सामूहिक शपथ.
PRESS MEDIA LIVE : पुणे :
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी (आझम कॅम्पस) मध्ये आंतरराष्ट्रीय कीर्तीचे हॉकी पटू ध्यानचंद यांचा जन्मदिन राष्ट्रीय क्रीडा दिन म्हणून साजरा करण्यात आला . आझम स्पोर्ट्स अकादमी च्या निवडक क्रीडापटूंच्या,प्राचार्य,क्रीडा शिक्षक यांच्या उपस्थितीत हा क्रीडा दिन साजरा करण्यात आला.क्रीडा संस्कृती जपण्याची सामूहिक शपथ यावेळी घेण्यात आली.
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार हे यावेळी कार्यक्रमाच्या अध्यक्ष स्थानी होते. 'ध्यानचंद सिंग यांच्या नावे जसा क्रीडा दिन साजरा होतो , आपल्या नावे असाच दिवस साजरा व्हावा अशी प्रतिज्ञा आजच्या दिवशी करा .त्यासाठी निर्धार करा ,कृती करा . त्यासाठी आम्ही सर्व सुविधा उपलब्ध करून दिल्या आहेत . पुण्याचे नाव क्रीडा क्षेत्रात जगात ओळखले जावे ,यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. दरवर्षी राष्ट्रीय क्रीडा दिनी आम्ही आमच्या यशवंत क्रीडापटूंचा सत्कार करू',असे प्रतिपादन डॉ पी ए इनामदार यांनी यावेळी बोलताना केले.
आझम स्पोर्ट्स अकॅडमी चे संचालक गुलझार शेख ,क्रीडा प्रशिक्षक माजिद सय्यद ,मुख्याध्यापक परवीन शेख,उप प्राचार्य गफार सय्यद ,क्रीडापटू यावेळी उपस्थित होते. आझम कॅपम्स च्या सर्व विद्यार्थ्यांसाठी या कार्यक्रमाचे फेसबुक लाईव्ह प्रक्षेपण करण्यात आले. हा कार्यक्रम २९ ओगस्ट रोजी सकाळी आझम कॅम्पस मैदानावर झाला . ----