आत्मनिर्भर भारत विषयावर घोषवाक्य स्पर्धा

आत्म निर्भर भारत 'विषयावर घोष वाक्य स्पर्धा .


PRESS MEDIA LIVE :  पुणे :

आबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागातर्फे 'आत्म निर्भर भारत 'विषयावर घोष वाक्य स्पर्धा आयोजित करण्यात आली होती . ऑनलाईन स्वरूपात झालेल्या या  स्पर्धेत महाविद्यालयाच्या विविध विभागाचे २८ विद्यार्थी सहभागी झाले . यशस्वी विद्यार्थ्यांना प्रमाणपत्रे देण्यात आली. 

स्पर्धेत परवीन शेख यांचा प्रथम ,रूपा राय यांचा  द्वितीय तर आशिया शिराळकर यांचा तृतीय क्रमांक आला. डॉ फरझाना शेख,प्रा .नाझिया मालदार यांनी संयोजन केले. प्राचार्य शैला बुटवाला,विभागप्रमुख डॉ एम जी मुल्ला यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले.


 
                                                                                             

Post a Comment

Previous Post Next Post