भारती विद्यापीठ अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण प्रणाली.
भारती विद्यापीठ अभिमत विश्वविद्यालयाच्या अभियांत्रिकी महाविद्यालयात ऑनलाईन शिक्षण प्रणालीद्वारे यशस्वी अध्यापन चालू असल्याची माहिती प्राचार्य डॉ आनंद भालेराव यांनी पत्रकाद्वारे दिली.कोरोना विषाणू साथीची सुरुवात झाल्यापासून या महाविद्यालयात ऑनलाईन लेक्चर्स,पॉवर पॉईंट प्रेझेंटेशन्स, असाइनमेंट आणि लॅब वर्क सुरु आहे . 'इम्पार्टस' आणि 'मायक्रोसॉफ्ट टीम्स' या प्रणालींचा उपयोग त्यासाठी केला जात असून मान्यताप्राप्त अधिकृत प्रणाली वापरली जात असल्याची माहिती डॉ भालेराव यांनी दिली.