दहावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटीच्या अँग्लो उर्दू
गर्ल्स हायस्कुल च्या शालांत परीक्षेत ९० टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या २० गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. हायस्कूल चा निकाल शंभर टक्के लागला आहे .या सत्कार प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्ष आबेदा इनामदार,शालेय व्यवस्थापन समितीचे सदस्य एस ए इनामदार,बद्रुद्दीन शेख ,मुख्याध्यापक आयेशा शेख,उप मुख्याध्यापक शबनम खान,पर्यवेक्षक झैनब सय्यद,शाहीन शेख,यास्मिन पठाण उपस्थित होते.