अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांनी देशसेवा करा :अंकल सोनावणे लोकजनशक्ती पक्षातर्फे अण्णाभाऊ साठे यांना अभिवादन संसदेत तैलचित्र लावण्याची मागणी
PRESS MEDIA LIVE. :. पुणे. : ( प्रतिनिधी ) :
' महापुरुषांच्या कार्याचे उत्सव होत राहिल्यानेच गाव कुसाबाहेर राहणाऱ्या समाजापर्यंत विचार पोहोचले .दोन पिढ्या या विचारांनी प्रेरित होऊन प्रगतीची वाट चालू लागल्या.सुशिक्षितांचे प्रमाण अण्णाभाऊ साठे यांच्या सारख्या महापुरुषांच्या विचारांच्या प्रबोधनामुळे वाढले. अण्णाभाऊ साठे यांच्या विचारांचे तरुणांनी मंथन करावे आणि त्यांनी दाखविलेल्या मार्गाने देशसेवा करावी,'असे प्रतिपादन आंबेडकरी चळवळीतील ज्येष्ठ कार्यकर्ते अंकल सोनावणेयांनी केले .
अण्णाभाऊ साठे यांना मरणोत्तर भारतरत्न पुरस्कार द्यावा आणि संसंदेत तैलचित्र लावण्याची मागणी प्रदेश सचिव अण्णासाहेब कांबळे यांनी आपल्या भाषणात केली .
या वेळी पक्षाच्या पुणे शहर जिल्हा शाखेचे अध्यक्ष संजय आल्हाट,प्रदेश सचिव अण्णासाहेब कांबळे,प्रवक्ते के सी पवार,माधव यादव ,आपासाहेब भोसले ,महिला आघाडी च्या सविता रणदिवे ,संजय चव्हाण,हिमेश पाडियार ,अर्जुन गायकवाड ,सुनील शेलार ,अतुल देवकुळे ,संतोष शिंदे ,संजय भोसले ,आदिनाथ भाकरे ,राहुल उभे ,चैतन्य खाडे ,निखिल जायभाय उपस्थित होते.