पुणे : आज पासून पुण्यात हॉटेल मॉल सुरू करण्यास परवानगी

आज पासून पुण्यात  हॉटेल, मॉल सुरु करण्यास परवानगी.


PRESS MEDIA LIVE :   पुणे : ( मोहम्मद जावेद मौला ) 

पुणे – मिशन बिगीन अंतर्गत शहरातील कंटेन्मेंट क्षेत्राबाहेरील निवासी सेवा पुरवणारे हॉटेल्स, लॉजेस आणि मॉल्स आजपासून सुरू करण्यास पुणे महापालिकेने काही अटी आणि शर्तींवर परवानगी दिली आहे. करोनाच्या पार्श्‍वभूमीवर संसर्ग टाळण्यासाठी दि.23 मार्चपासून देशभरात लॉकडाऊन जाहीर केल्यानंतर हॉटेल्स, लॉजेस आणि मॉल्स सध्या बंद आहेत.

पुणे महापालिका आयुक्‍तांनी सोमवारी सायंकाळी यासंदर्भातील आदेश प्रसिद्धीला दिले आहेत.

हॉटेल्ससाठी सूचना

– कंटेन्मेट क्षेत्र वगळून निवासी सेवा पुरवणारे हॉटेल्स, लॉजेस, गेस्ट हाऊस व्यवसाय एकूण क्षमतेच्या 33 टक्‍के सुरू करता येणार आहेत. उर्वरित 67 टक्‍के भाग महापालिका वेळप्रसंगी क्वारंटाइन सेंटर म्हणून वापरू शकतील, अशी अट घालण्यात आली आहे.
– स्वच्छता, सॅनिटायझेशन, थर्मल चेकिंग, सुरक्षित बैठक व्यवस्था, फिजिकल डिस्टन्सिंग, ग्राहक आणि कर्मचाऱ्यांनी मास्कचा वापर करणे याची काळजी व्यावसायिकांनी घ्यावयाची आहे.
– प्रवेश दिलेल्या प्रत्येक व्यक्तीची ओळखपत्रासह प्रवासाची माहिती, आरोग्याची स्थिती, स्वयंघोषणापत्र घ्यावे. ग्राहकांना आरोग्य सेतू ऍप वापरणे बंधनकारक राहील.

मॉल्ससाठी सूचना

– कंन्टेंन्मेंट झोनमधील शॉपिंग मॉल पूर्णपणे बंद राहातील. मॉलमध्ये दोन व्यक्तिंमधील अंतर सहा फूट असणे आवश्‍यक.
– प्रत्येकाने मास्कचा वापर करावा. मॉलमध्ये येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीस आरोग्य सेतू ऍप अनिवार्य.
– कर्मचाऱ्यांनी दिवसांतून किमान 3 वेळा साबणाने हात धुणे आवश्‍यक.
– मॉलच्या प्रवेशद्वारावर प्रत्येकाचे थर्मल स्कॅनिंग आणि सॅनिटायझेशनची व्यवस्था अनिवार्य असेल.

Post a Comment

Previous Post Next Post