सरकारने करोना रिंगटोन आधी बंद करावी.

  सरकार ने ‘करोना रिंगटोन’ आधी बंद करावी.



PRESS MEDIA LIVE : पुणे ( प्रतिनिधी) :

पुणे : मार्च महिन्यापासून जगभरात करोनाचा धोका सुरु झाल्यावर अनेक देशांनी नागरिकांना सुरक्षेच्या उपायांवरुन जागृती करण्यासाठी निरनिराळ्या युक्त्या वापरल्या. भारतात मोबाइल रिंगटोनद्वारे हेच काम सुरु करण्यात आले. मात्र, आता गेल्या पाच महिन्यांपासून देशवासियांनी कोणालाही फोन लावला करी पहिल्यांदा हीच रिंगटोन ऐकू येते. आता त्याचा मानसिक त्रास सुरु झाला असून सरकारने ही रिंगटोन बंद करावी, असे आवाहन सोशल मीडियावरून करण्यात आले आहे.

‘नोव्हेल करोनाव्हायरस…’ अशी वाक्ये एकू येऊ लागली की आता सर्वांनाच त्याचा मानसिक त्रास होत आहे. यावरुन आता विनोदही निर्माण होत असून एका चांगल्या योजनेची अशी बदनामी होऊ नये म्हणून आता सरकारनेच ही रिंगटोन बंद करावी, अशी मागणीही केली जात आहे.

‘पावसाने निर्माण झालेल्या पुराच्या पाण्यात एक नागरिक अडकून पडला होता व त्याने आपल्या मोबाईलवरून मदतीसाठी एका व्यक्तीला फोन लावला. मात्र, ही रिंगटोन सुरू झाली व ती संपून त्या व्यक्तीला फोन लागण्यापूर्वीच पाण्यात अडकलेला व्यक्ती बुडाला,’ अशा धाटणीचे विनोद आता सुरु झाले आहेत.स सरकारनेत्वरीत ही रिंगटोन बंद करावी अन्यथा या जनजागृतीसाठी सुरु झालेल्या संदेशाची सातत्याने टर उडवली जाईल, असेही मत नेटकऱ्यांनी आपल्या मागणीत म्हटले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post