रोड टू इंडिपेंडन्स विषयावर व्याख्यान आणि स्पर्धा


रोड टू इंडिपेंडन्स'विषयावर व्याख्यान आणि स्पर्धा

PRESS MEDIA LIVE : पुणे 

अबेदा इनामदार वरिष्ठ महाविद्यालयाच्या बी.बी.ए.(बी.सी.ए) विभागाने 'रोड-टू इंडिपेंडन्स'आणि 'सेल्फ रिलायंट इंडिया' विषयावर ऑनलाईन व्याख्यान आणि प्रश्नमंजुषा स्पर्धा आयोजित करण्यात आली.'अर्थव्यवस्थेच्या प्रत्येक क्षेत्रात पुनरुज्जीवन करणे आणि भविष्यातील परिस्थिती टिकवून ठेवण्यासाठी आणि भारताला आत्मनिर्भर बनविणे आवश्यक आहे',असे खालिद अर्शद यांनी व्याख्यानात सांगितले.

 स्पर्धेत 105 विद्यार्थ्यांनी भाग घेतला. सहभागींना ई-प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. कार्यक्रमाचे संयोजन निरज बागवे,अश्विनी थोपटे यांनी केले. प्राचार्य डॉ.शैला बुटवाला,विभागप्रमुख डॉ.अलिफिया जहागीरदार यांनी यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन केले. 

                                                                                                                 

Post a Comment

Previous Post Next Post