बारावीतील यशस्वी विद्यार्थ्यांचा सत्कार
PRESS MEDIA LIVE : पुणे
महाराष्ट्र कॉस्मोपॉलिटन एज्युकेशन सोसायटी च्या आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी परीक्षेतील गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार संस्थेचे अध्यक्ष डॉ पी ए इनामदार,उपाध्यक्ष अबेदा इनामदार यांच्या हस्ते करण्यात आला. आबेदा इनामदार कनिष्ठ महाविद्यालयाच्या बारावी परीक्षेचा निकाल 96.40 टक्के लागला व या संस्थेच्या अंतर्गत चालविल्या जाणार्या स्काॅलर बॅच चा निकाल 100 टक्के लागला.90 टक्क्यांहून अधिक गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या गुणवंत विद्यार्थ्यांचा व कला, विज्ञान,वाणिज्य, व्होकेश्नल व स्काॅलर बॅच या शाखांतून प्रथम, द्वितीय व तृतीय आलेल्या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला .या सत्कार प्रसंगी संस्थेच्या उपाध्यक्षा आबेदा इनामदार,संस्थेचे सदस्य एस ए इनामदार,बद्रुद्दीन शेख , प्राचार्य आयेशा शेख,उप प्राचार्य गफार सय्यद , पर्यवेक्षिका तस्नीम शेरकर, गुणवंत विद्यार्थी व पालक उपस्थित होते.