पिंपरी चिंचवड : महापालिका आयुक्त पुन्हा क्वॉरंटाइन.
PRESS MEDIA LIVE : PIMPRI :
पिंपरी – पिंपरी चिंचवड महापालिकेतील आयुक्तांच्या कक्षामध्ये करोनाचा शिरकाव झाला आहे. आयुक्त श्रावण हर्डीकर यांचे स्वीय सहायक यांना करोनाची लागण झाली आहे. त्यामुळे आयुक्त कक्ष व त्या परिसरामध्ये नागरिकांच्या येण्या-जाण्यावर बंधने घालण्यात आली आहेत. तसेच आयुक्तही पुन्हा एकदा घरी क्वॉरटांइन झाले आहेत.
शहरामध्ये करोनाचा संसर्ग मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. महापालिकेमध्ये आजपर्यंत 130 जणांना करोनाची लागण झाली आहे. पालिकेतील तळमजल्यापासून ते महापौरांच्या कक्षापर्यंत करोनाचा शिरकाव झाला होता. तर आता आयुक्तांच्या कक्षामध्येही करोनाने एन्ट्री केली आहे. आयुक्ताचे स्वीय सहायक यांना करोनाची लागण झाली आहे.
तसेच आयुक्तांच्या बंगल्यावरील शिपायाचाही तपासणी अहवाल पॉझिटिव्ह आल्याचे समजले आहे. यापूर्वी आमदार व बंगल्यावरील शिपाई पॉझिटिव्ह आल्याने आयुक्त क्वांरटाईन झाले होते. आता स्वीय सहायक करोनाबाधित झाल्याने आयुक्त पुन्हा क्वॉरंटाइन झाले आहेत.