देशात वाढतोय लोकशाहीवर हुकूमशाहीचा प्रभाव
नवी दिल्ली – राष्ट्रद्रोही आणि गरीबांचे शत्रू देशांत द्वेष आणि हिंसाचार पसरवत आहेत. देशातील लोकशाहीवर हुकूमशाहीचा प्रभाव वाढत आहे, अशी घणाघाती टीका कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी शनिवारी केली.
PRESS MEDIA LIVE :
देशाच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्यांना कल्पनाही नसेल की स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतरच लोकशाही धोक्यात येईल. कुविचारी लोकांचा प्रभाव वाढत आहे. अभिव्यक्ती स्वातंत्र्य धोक्यात आले आहे आणि लोकशाही संस्था जमीनदोस्त होत आहेत, असेही सोनिया गांधी म्हणाल्या. नवा रायपूर येथे छत्तिसगढ विधानसभेच्या नव्या इमारतीच्या उद्घाटनप्रसंगी सोनिया बोलत होत्या. त्यांनी ध्वनी मुद्रित संदेश पाठवला होता.
गेल्या काही काळापासून देशाची घडी विस्कटण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न होत आहे. आपल्या लोकशाहीपुढे नवी आव्हाने उभी रहात आहेत. आज आपला देश मार्ग बदलण्याच्या जागेवर उभा आहे. लोकांनी एकमेकांशी भांडण्यात वेळ घालवावा म्हणून काही लोक द्वेष पसरवण्याचा प्रयत्न करत आहेत. गरीबांचे द्वेष्टे हिंसाचार पसरवत आहेत, असे कॉंग्रेस अध्यक्षा म्हणाल्या
देशातील लोकांचा आवाज दाबण्याचा प्रयत्न होत आहे, अशी टीका कोणाचेही नाव न घेता त्यांनी केली. त्या म्हणाल्या, त्यांना काय हवे आहे? आपल्या देशातील नागरिक, आपले तरूण, आपले आदिवासी, आपल्या महिला, आपले शेतकरी, दुकानदार आणि लहान व्यापारी, जवान यांनी त्यांचे तोंड बंद ठेवायला हवे आहे
दोन वर्षानी देश स्वातंत्र्याच्या अमृतमहोत्सवी वर्ष पूर्ण केले. राष्ट्रपिता महात्मा गांधी, माजी पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरू, जी. व्ही मावळणकर (पहिल्या लोकसभेचे सभापती), डॉ. बाबासेब आंबेडकर यांच्यासह तत्कालीन नेत्यांनी स्वप्नातही विचार केला नसेल, स्वातंत्र्याच्या 75 वर्षानंतर देशाला अशा कठीण काळाचा सामना करावा लागेल. आपली घटना आणि लोकशाही धोक्यात येईल, असे त्या म्हणाल्या.
कॉंग्रेस नेते राहूल गांधी व्हिडिो कॉन्फरन्सिंगने या सोहळ्यात सहभागी झाले होते. मुख्यमंत्री भूपेश बघेल, बिधान सभेचे सभापती चरणदास यांच्यासह राज्यातील विविध खात्यांचे मंत्री यात सहभागी झाले होते.
लोकशाहीचे संरक्षण करू
आज महत्वाचा दिवस आहे, आपण लोकशाहीचा माया मजबूत ठेवण्यासाठी कटीबध्द होऊयात. आपण सत्तेवर असेपर्यंत रांगेतील अखेरच्या व्यक्तीच्या उथ्थानाचा विचार करूयात. त्यांच्या हिताचे रक्षण करू, असे सोनिया गांधी म्हणाल्या.
केवळ इमारत बांधून लोकशाही वाचणार नाही. लोकशाही भावनांनी वाचवली पाहिजे.