मुंबई. केंद्रीय राज्यमंत्री रांमदास आठवलेना राखी बांधून देहविक्री करणाऱ्या महिलांनी साजरा केला रक्षा बंधन सोहळा.

 

   कामाठीपुऱ्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या पाल्यांसाठी वसतिगृह उभारण्याची गरज - केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

केंद्रियराज्यमंत्री रामदास आठवलेंना राखी बांधून देहविक्रय करणाऱ्या महिलांनी साजरा केला रक्षाबंधन  सोहळा.



PRESS MEDIA LIVE :. मुंबई :

मुंबई दि. 3 - कामाठीपुरा येथील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या पाल्यांना  चांगले शिक्षण मिळण्यासाठी निवासी शाळा तसेच वसतिगृह उभारण्याची गरज आहे. त्यासाठी आपण मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठवून प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिले. बांद्रा पूर्वेतील त्यांच्या संविधान  निवासस्थानी आज  सोशल ऍक्टिव्हिटीज इंटिग्रेशन  उर्फ साई संस्थेतर्फे  रक्षाबंधन कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी देहविकृय करणाऱ्या महिला आणि त्या महिलांचे प्रबोधन करणाऱ्या स्वयंसेवीकांनी ना रामदास आठवले यांना ओवाळवून  राखी बांधत रक्षाबंधन  सोहळा साजरा केला. यावेळी साई संस्थेचे ट्रस्टी विनय वत्स; संजय भिडे ;हेमंत रणपिसे; अमित तांबे आदी मान्यवर उपस्थित होते. 

   कामाठीपुऱ्यातील देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या मुला मुलींना चांगले शिक्षण देण्यासाठी साई संस्था कार्यरत आहे. मुंबई महापालिकेतर्फे काही ठिकाणी या मुलांसाठी तसेच निराधार फुटपाथवरील मुलांसाठी शेल्टर्स सुरू करण्यात आले होते. कोरोना च्या प्रादुर्भावामुळे ते आता बंद झालेत. त्यामुळे आता ही मुले उघड्यावर आली असून पुन्हा कामाठीपुऱ्यातील वस्ती राहिल्यास या मुलामुलींचे आरोग्य आणि भवीतव्य धोक्यात येणार असल्याने या पाल्यांसाठी कामाठीपुरा येथिल शाळेचे वर्ग द्यावेत या मागणी चे निवेदन साई संस्थेतर्फे ना रामदास आठवले यांना देण्यात आले. त्यावर देहविक्रय करणाऱ्या महिलांच्या पाल्यांसाठी कामाठीपुरा येथे  निवासी शाळा किंवा वसतिगृह मुंबई महापालिकेने उभारावे यासाठी आपण मुंबई महापालिका आयुक्तांना पत्र पाठविणार असल्याचे आश्वासन ना रामदास आठवले यांनी दिले. 


               
             

Post a Comment

Previous Post Next Post