मुंबई. माजी आमदार सुधाकर पंत यांच्या

माजी आमदार सुधारकरपंत परिचारक यांच्या निधनाने साधी राहणी उच्च विचारांचे लोकनेते हरपले- केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले

P RESS  MEDIA LIVE : मुंबई : 

मुंबई दि.18 - राज्य परिवहन ।महामंडळाचे माजी अध्यक्ष  पंढरपूर चे माजी आमदार सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने राजकारणातील श्रेष्ठ आदरणीय  व्यक्तीमत्व ; साधी राहणी उच्च विचारांचे सहकार चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक  लोकनेते हरपले आहेत अशा शब्दांत रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी दिवंगत सुधाकरपंत परिचारक यांना विनम्र श्रद्धांजली अर्पण केली आहे.

सुधारकरपंत परिचारक हे पंढरपूरमधून 5 वेळा आमदारपदी निवडून आले होते. मी पंढरपूरचा खासदार असताना ते पंढरपूर चे आमदार होते. त्यांच्या शी माझे अत्यंत जवळचे सबंध होते. ते अत्यंत ज्येष्ठ मात्र तेव्हढेच  नम्र विनयशील नेते होते. सहकार चळवळीचे ज्येष्ठ मार्गदर्शक लोकनेते होते. त्यांनी अनेक सहकारी संस्था आणि सहकारी बँका त्यांनी उत्कृष्टपणे  चालविल्या. त्यांना कोरोनाची लागण होऊन वयाच्या 86 व्या वर्षी त्यांचे निधन झाले. सुधाकरपंत परिचारक यांच्या निधनाने सहकार चळवळीचे उच्च  विचारांचे ज्येष्ठ मार्गदर्शक नेतृत्व  हरपले आहे अशी शोकभावना ना रामदास आठवले यांनी पाठविलेल्या शोकसंदेशात व्यक्त केली आहे. 



         

                 

Post a Comment

Previous Post Next Post