ठाकरे सरकारच 'शिवभोजन',तर काँग्रेसच 'इंदिरा रसोई योजना'; ८ रुपयांत मिळणार जेवण
PRESS MEDIA LIVE :
महाराष्ट्रात ज्याप्रकारे महाविकास आघाडीने शिवभोजन योजना सुरु केली आहे. याच धर्तीवर राजस्थान सरकारने नवीन योजना आणली आहे. राज्यातील कोणाताही व्यक्ती भुकेला राहू नये यासाठी २० ऑगस्टपासून राजस्थानात इंदिरा रसोई योजना सुरु करण्यात येत आहे. त्यामुळे गुरुवारी सकाळी साडे ८ वाजता टोंक जिल्ह्यातून या योजनेचा शुभांरभ होणार आहे.टोंक जिल्ह्यातील ८ मोबाईल व्हॅन्सच्या माध्यमातून इंदिरा रसोई योजना सुरु करण्यात येईल. यामाध्यातून २ हजार ४०० लोकांना दररोजचं भोजन मिळेल.
मराठमोळ्या सारिका काळेला अर्जुन पुरस्कार जाहीर
भारतीय महिला खो-खो संघाची कर्णधार सारिका काळे हिला क्रीडा क्षेत्रातील सर्वोच्च मानला जाणारा अर्जुन पुरस्कार जाहीर झाला आहे. वयाच्या अकराव्या वर्षापासून क्रीडा क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी करणार्या सारिका काळे हिने अनेक राज्य, राष्ट्रीय स्पर्धांमध्ये संघाला सतत विजय मिळवून दिला आहे. तिला अर्जुन पुरस्कार जाहीर झाल्याने जिल्ह्याच्या गौरवात भर पडली असल्याची भावना आहे.वयाच्या अकराव्या वर्षी सारिकाने क्रीडाक्षेत्रात पाऊल टाकले. शालेय स्तरावरील खो-खो स्पर्धेतील तिचे थक्क करणारे क्रीडाकौशल्य कौतुकास्पद होते. २००६-०७ मध्ये तिची महाराष्ट्र संघात निवड झाली.आपल्या अथक परिश्रमाने सलग २० राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने संघाला यश मिळवून दिले. सांघिक खेळांमध्ये १२ सुवर्ण व चार कांस्यपदके तिने महाराष्ट्र संघाला मिळवून दिली. २०१०-११ मध्ये महाराष्ट्र संघाच्या कर्णधारपदी तिची निवड झाली. छत्तीसगढमध्ये झालेल्या स्पर्धांमध्येही तिने सुवर्णपदक मिळवले. नंतर तीन राष्ट्रीय स्पर्धांमध्ये तिने कर्णधारपद भूषविले.