कोल्हापूर : हुतात्म्यांना वृक्षारोपणाने अभिवादन !
PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर : भरत घोंगडे :
कोल्हापूर : क्रांती दिनाच्या पार्श्वभूमीवर आमदार चंद्रकांत जाधव यांनी हुतात्मा पार्क येथे वृक्षारोपण करून हुतात्म्यांना अभिवादन केले. हुतात्मा पार्क येथे स्वातंत्र्यसैनिक दत्तोबा तांबट यांच्या पुतळ्याच्या मागे एक झाड होते. त्यामुळे पुतळ्याला हानी पोहचू शकत होती. या कारणाने ते झाड गेल्या १५ दिवसांपूर्वी आमदार जाधव यांनी पाडण्यास सांगितले. मात्र त्यासाठी परिसरात दुसरी झाडे लावण्यास सांगितले होते.दरम्यान, क्रांती दिनाच्या निमित्ताने हुतात्मा पार्क येथील हुतात्म्यांना अभिवादन करण्यासाठी आज गेलेल्या आमदार जाधव यांनी प्रथम वृक्षारोपण केले आणि दत्तोबा तांबट यांना अभिवादन केले.
दरम्यान, यावेळी उपमहापौर संजय मोहिते, नगरसेवक अजित ठाणेकर, अशोकराव जाधव, संभाजीराव जाधव, अशोक सुतार, महादेव पाटील, हणमंतराव पोवार, पुंडलिक साळोखे, अजित तोडकर, किशोर मोरे, किशोर मानकर, रवी तांबट, निशिकांत तांबट, प्रभाकर तांबट, अमित शिंदे आदी उपस्थित होते. अनिल घाटगे यांनी प्रास्ताविक केले, तर शरद तांबट यानी आभार मानले.