ज्येष्ठ विधिज्ञ, कायदेतज्ञ अॅड.पंडितराव सडोलीकर यांचे वयाच्या ६१व्या वर्षी ह्रदयविकाराच्या धक्याने दु:खद निधन
PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :
कोल्हापूर : गंधर्व नगरी,फुलेवाडी रिंगरोड येथील ज्येष्ठ विधिज्ञ,कायदेतज्ञ अॅड.पंडितराव सडोलीकर यांचे वयाच्या ६१व्या वर्षी ह्रदयविकाराच्या धक्याने दु:खद निधन झाले.त्याच्या मागे आई,वडिल,पत्नी,दोन मुलगे,सुना असा मोठा परिवार आहे.
जलदान विधी गुरुवार दि.६ रोजी आहे.
कोणत्याही लाभाच्या,राजकीय,आमदारकी खासदार की या पदाची अपेक्षा न बाळगता निस्वार्थीपणा ने केंद्रीय मंत्री नामदार रामदासजी आठवले साहेबांच्या खांद्याला खांदा लावून पॅंथर चळवळीत विद्यार्थीदशे पासून रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया पक्षा च्या जडणघडणीत मध्ये जोमाने अग्रभागी असणारे अनुभवी पॅंथर तथा ज्येष्ठ विधिज्ञ,कायदेतज्ञ व रि.पा.ई. ( आ ) महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. पंडितरावजी सडोलीकर साहेब
सर्वसामान्य, दलित, शोषित, पीडित, उपेक्षित, वंचित, शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आंदोलन, मोर्चाचे नेतृत्व करून रस्त्यावर उतरून आय.ए.एस.,आय.पी.एस.अधिकार्याशी प्रंसगी संघर्ष करुन सर्वसामान्यांना न्यायालयीन,कायद्याने न्याय मिळवून देणारे ज्येष्ठ वकिल तसेच लढाऊ पॅंथर. निष्कलंक,स्वच्छ प्रतिमेचे नेते ज्येष्ठ विधिज्ञ अॅड. पंडितराव सडोलीकर साहेबांच्या निधना बद्दल भावपूर्ण आदरांजली
शोकाकुल अमोल कुरणे