डी के टी कोविड केअर सेंटर इचलकरंजी येथे

डी.के.टी.ई. कोविड केअर सेंटर इचलकरंजी येथे अँटीजन टेस्ट (रॅपिड टेस्ट) सेंटरचे उद्घाटन जिल्हा परिषद सदस्य राहुल आवाडे (साहेब) यांच्या हस्ते करण्यात आले.


PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी :

इचलकरंजी  : सध्या कोरोना संक्रमणाची संख्या मोठ्या प्रमाणात वाढत चालली आहे. अश्या परिस्थितीत तपासणी व चाचणीसाठी साठी सीपीआर व आयजीएम रुग्णालयात असलेल्या चाचणी केंद्रावर मोठ्या प्रमाणावर त्याचा ताण पडत आहे. या पार्श्वभूमीवर पर्यायी व्यवस्था करण्याची गरज ओळखून डी.के.टी.ई. कोविड केअर सेंटर इचलकरंजी येथे अँटीजेन टेस्ट सेंटर सुरु करण्यात येत आहे. त्यानुसार आज या अँटीजेन सेंटरचा शुभारंभ पार पडला. तसेच टेस्टिंग नंतर लवकरात लवकर तपासणी अहवाल मिळणार असल्याने रुग्णांना मिळणारे उपचार ही लवकर मिळतील.

यावेळी नगरसेवक सुनील पाटील, मुख्याधिकारी दिपक पाटील, डॉ.मिरजे, डॉ.बडबडे, डॉ. सुनीलदत्त संगेवार ,बाळासाहेब माने यांच्यासह डी.के.टी.ई. कोविड केअर सेंटर मधील डॉक्टर व नर्सेस उपस्थित होते.



Post a Comment

Previous Post Next Post