रूई मानेनगर येथील बैतूल माल कमिटीच्याजोरदार प्रयत्नांना यश... विकास कामाला सुरवात., विरोधकांच्या झोपा उडाल्या.
PRESS MEDIA LIVE : इचलकरंजी : मनु फरास :
इचलकरंजी :. गेली अनेक वर्ष रुई येथील माने नगर गट क्रमांक 599 हा भाग विकास कामापासून वंचित होता. ना रस्ते ना गटारी, ना ग्रामपंचायत कडून चौकशी, इतकी वाईट अवस्था रुई येथील माने नगरची होती. या बाबत बैतूल माल कमिटी ने अथक परिश्रम घेऊन, सतत पाठपुरावा करून अखेर त्यांच्या प्रयत्नाला यश आले व भागातील विकास कामाला सुरुवात जोरदार सूरवात झाली. गेल्या तीस वर्षे ना गटारी, ना संडास, ना रस्ते अशी दुर्दैवी परिस्थिती होती . या बाबत प्रेस मीडिया याने प्रथम बातमी प्रसिद्ध करून खळबळ उडवून दिल्यामुळे कामास गती आली. या कामासाठी त्यांना सर्व बाजूंनी साथ मिळाली असून त्यांना विशेष करून शिवसेना शाखाप्रमुख अविनाश शिंदे यांचे विशेष सहकार्य लाभले. या वेळी उद्घाटन प्रसंगी, पश्चिम महाराष्ट्र दलित महासंघ उपाध्यक्ष अंजुम देसाई, अविनाश शिंदे, कमिटीचे अध्यक्ष अल्लाउद्दीन जमादार, आसिफ इनामदार, हाफीज रमजान शेख, सलीम बेपारी, यासिन मुजावर सलीम नदाफ, अल्लाबक्ष देसाई, समीर जंगले, आदी नागरिक उपस्थित होते..