इचलकरंजी : डीकेटीईच्या ५० विद्यार्थ्यांची आंतराष्ट्रीय कंपनीमध्ये निवड.
PRESS MEDIA LIVE. : इचलकरांजी : (मनु फरास :)
येथील डीकेटीई संस्थेच्या इंजिनिअरींग विभागामध्ये कॅपजेमिनी, पुणे या कंपनीने लॉकडाऊन पूर्वी कॅम्पस इंटरव्हयू आयोजित केला होता. यामध्ये संस्थेच्या सर्वाधिक ५० विद्यार्थ्यांची निवड केलेली आहे. निवड झालेल्या विद्यार्थ्यांना वार्षिक ३.८ लाख पॅकेज देण्यात आले आहे. सध्या नोकरीच्या क्षेत्रात आय.टी. कंपन्यांचा दबदबा आहे. आणि इंजिनिअरींग क्षेत्रात जोरदार स्पर्धा असल्याकारणाने हे यश मोठे मानले जाते आहे.
कॅपजेमिनी ही फ्रान्सस्थित जागतिक मानांकीत सॉफ्टवेअर निर्मिती कंपनी असून जगभरात अनेक देशामध्ये कंपनीचे कॉर्पोरेट ऑफीस आहेत. भारतामध्ये पुणे येथील कार्यरत असणा-या कंपनीच्या माध्यमातून डीकेटीईच्या ५० विद्यार्थ्यांची निवड करण्यात आली आहे. या कॅम्पस इंटरव्हयू करीता एकूण तीन फे-या घेण्यात आल्या. अॅप्टीटयूट, टेक्निकल आणि एच.आर. राऊंड या सर्व फे-यांमध्ये डीकेटीईच्या सर्व विद्यार्थ्यांनी चांगल्या प्रकारे आपली गुणवत्ता सिध्द केली. संस्थेमध्ये इंटरव्हयूच्या तयारीसाठी प्रत्येक विभागामध्ये खास प्रशिक्षण वर्ग घेतले जातात, तसेच विद्यार्थ्यांच्या तयारीकडे विशेष लक्ष दिले जाते. त्यामुळेच या तयारीचा खूप उपयोग झाला.या प्लेसमेंटसाठी संस्थेचे इंजिनिअरींग विभागाचे टीपीओ प्रा.जी.एस.जोशी यांनी विशेष परिश्रम घेतले.
निवड झालेले विद्यार्थी कॉम्प्युटर विभागमधून स्वाती भावी, सानिका खवाटे,सोनाली कडोले,वैष्णवी मुरदुंडे,श्रुती नरदेकर,स्नेहल पाटील,शुभम पाटील,सुप्रिया शिंदे,रोजमीन सुतार.आय.टी.विभागामधून- अलिशा बोरा,कुणाल गनवीर,तेजेस्वी घेवडे,स्मिता गुडसे,श्वेता खामकर,सुप्रिया कोकरे,पुजा मगदूम,अनघा नांदगावे,शुभम ओझा,श्रध्दा पटटणशेटटी,स्वरुपा पवार,वैष्णवी राऊत,विनया शिर्के,नम्रता टक,सुश्मिता उडपी इलेक्ट्रॉनिक्स विभागमधून -आयुती अलगुर,सौरभ बगाडे,शुभम भोसले,रितीका चुडाप्पा,हिरकणी दाणेकरी,रितीका हेरवाडे,सौरभ कुलकर्णी,त्रिवेणी कुंभार,भाग्यश्री मगदूम,संयोगिता माने,निशा मेटकरी, संहिता पाटील,ऐश्वर्या पाटील,वर्धमान पाटील,सनो पिंपारे,वैष्णवी यादव इलेक्ट्रॉनिक्स अॅण्ड टेलिकम्युनिकेशन विभागमधून-रोहीणी आदमापुरे,साकिब अत्तार,प्रणिता दौंडे,युवराज माळी,सोनु मेहता,साहिल मुजावर,सना पटेकरी,आरती फडतारे,तेजेस रेडेकर,सोनल उरणे. विद्यार्थ्यांच्या या यशाबददल डीकेटीई संस्थेचे अध्यक्ष कल्लाप्पाण्णा आवाडे, आमदार प्रकाश आवाडे, मानद सचिव डॉ. सपना आवाडे यांच्या हस्ते या विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. सदर सत्कार प्रसंगी संस्थेचे सर्व विश्वस्त उपस्थित होते. विद्यार्थ्यांस संचालक प्रा.डॉ.पी.व्ही. कडोले,डे.डायरेक्टर प्रा.डॉ.यु.जे.पाटील प्रा.डॉ.सौ.एल.एस.अडमुठे,विभागप्रमुख डॉ.एस.ए.पाटील, डॉ.डी.व्ही.कोदवडे व सर्व प्राध्यापक वर्गाचे मार्गदर्शन लाभले.