बेडकिहाळ ग्रामपंचायतीचा मनमानी कारभार

 

बेडकिहाळ ग्राम पंचायतीचा मनमानी कारभार :  तक्रार दाखल  करणाऱ्यांकडून बेकायदेशीर १००० रु दंड वसूल केला

PRESS MEDIA LIVE ; कर्नाटक बेडकिहाळ :

 (विक्रम शिंगाडे : बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी )

    बेडकिहाळ ग्राम पंचायतीचा हुकुमशाही कायदा बेडकिहाळातील सर्वसामान्य नागरिकांनावर न्याय मागायला गेल्यानंतर तक्रार नोंदविण्यासाठी १००० रु भरुन घेऊन रिसिट देऊनच तक्रार  नोंद करुन घेतले.  बेकायदेशीर पैसे उकळन्याचे काम प्रशासकीयाने करण्यास सुरुवात केली आहे. तक्रारदार म्हणून आप्पासाहेब बेडगे यांनी बेडकिहाळ ग्राम पंचायत गाठले. व त्यांच्यावर होत असलेल्या अन्याया बाबत संपूर्ण माहिती संबंधित ग्राम विकास अधिकारी व कर्मचारी यांनी सर्व ऐकुन घेतले. माझ्या घराच्या बाजूस सरकारी रहदारीचा रोड असताना त्या रस्त्यावर बांधकाम करत असल्याने मला ये जान्यासाठी त्रास होत असल्याने तक्रार ग्राम पंचायत कडे दिलेलो आहे. त्याचा विचार अजुनही  केलेला नसल्यामुळे माझे पैसे भरुन घेऊन न्याय सुध्दा मिळाला नाही. माझ्याकडे तक्रार पे म्हनून १००० रू घेतले आहेत हे कुठेही कायद्यामध्ये नसताना फक्त माझ्याकडेच तक्रार दंड म्हनुन वसुली केली आहे. मीही एका मोठ्या एक्स एम.एल.ए. यांच्या घरातील हा विषय असुन किती मोठा अन्याय आमच्या घरावर होत असल्याची खंत त्यांनी मांडली. स्वातंत्र झाल्यापासून भारतातील कूठल्याच ग्राम पंचायत ने तक्रार दाराकंडुन आजपर्यंत पैसे घेतलेले नाहीत मात्र बेडकिहाळ ग्राम पंचायतीने हा इतिहासच घडविला आहे.  हा एक प्रकारचा माझ्यावर व माझ्या कुटुंबावर होत असलेला अन्याय आहे. बेडकिहाळ ग्राम पंचायतचा मनमानी कारभार कधी थांबणार!  जर मला न्याय मिळाला नाही तर मी वरीष्ठ अधिकारी कंडे न्याय मागण्यासाठी धाव घेणार आहे. जर त्यांनी सुध्दा न्याय मिळवून दिला नाही तर मी न्यायालयाकडे धाव घेणार असल्याची माहिती आप्पासाहेब बेडगे व त्यांचे चिरंजीव अजिंक्य बेडगे यांनी दिली.

Post a Comment

Previous Post Next Post