शिरोळ गावची कन्या पूजा प्रियदर्शिनी यांची


शिरोळ गावची कन्या पूजा प्रियदर्शिनी यांची पॅरिस येथे भारतीय दूतावास द्वितीय सचिव पदी नियुक्ती.

PRESS MEDIA LIVE :

अब्दुललाट ता. शिरोळ गावची कन्या पूजा प्रियदर्शनी ह्यांची पॅरिस येथे भारतीय दूतावास द्वितीय सचिवपदी नियुक्ती करण्यात आली आहे. पूजा या लाटचे सुपुत्र श्री ज्ञानेश्वर मुळे (राष्ट्रीय मानव आयोग) व माजी परराष्ट्रीय सचिव यांच्या कन्या असून देशाचे प्रतिनिधित्व करण्यास त्या आज पॅरिसला रवाना झाल्या. गतवर्षी 2019 च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत देशात 11 व्या क्रमांकाने यश संपादन करणाऱ्या पूजा यांनी कोलंबिया विद्यापीठात पदव्युत्तर शिक्षण घेतले आहे. नोकरी करत त्यांनी लोकसेवा आयोगाच्या परीक्षेचा अभ्यास केला.  आंतरराष्ट्रीय कंपनीत त्यांनी अधिकारी म्हणून काम केले आहे. पूजा यांच्या आई सौ. साधना शंकर यादेखील भारतीय राजस्व सेवेत मुख्य सचिव म्हणून दिल्ली येथे कार्यरत आहेत. ज्ञानेश्‍वर मुळे यांच्या पावलांवर पाऊल ठेवत त्याही देश सेवेसाठी आज रवाना झाल्या. आई-वडीला प्रमाणे त्यांनाही लेखनात रस आहे. त्यांनी अनेक देशात प्रवास केला आहे.त्यांच्या नियुक्तीमुळे अब्दुल लाट मध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे. लोकांकडून त्यांना शुभेच्छांचा वर्षाव होत आहेत.

पूजा प्रियदर्शिनी यांचे हार्दिक अभिनंदन आणि भावी वाटचालीसाठी शुभेच्छा!!

Post a Comment

Previous Post Next Post