ज्यादा बिल आकारल्या मुळे शहरातील जहांगीर हॉस्पिटलला नोटीस.
जुपिटर रुग्णालयालाही नोटीस.
PRESS MEDIA LIVE :. पुणे : ( प्रतिनिधी ) :
बेडस्ची माहिती अपडेट न करणेही अंगलट
रुग्णालयातील बेडस्ची माहिती एकत्र करण्यासाठी तसेच माहिती मिळण्यासाठी संगणकीय यंत्रणा उभारली आहे. यामध्ये शहरातील रुग्णालयांनी शिल्लक बेडस्ची माहिती देणे आवश्यक असते. व्हेंटिलेटरची सोय असलेल्या बेडस्ची माहिती काही रुग्णालयांकडून दिली जात नाही. त्यामुळे तेथे नक्की किती बेड शिल्लक आहेत, याची माहितीच मिळत नाही. व्हेंटिलेटर असलेले बेडस्च नसल्याच्या तक्रारी वारंवार येत आहेत. त्याचबरोबर रुग्णांना एका रुग्णालयातून दुसऱ्या रुग्णालयात पाठवले जात आहे. त्यामुळे जी रुग्णालये माहिती देत नाहीत, त्यांना नोटीस बजावण्यात आल्या आहेत.
करोना उपचारांबाबत नियम न पाळणाऱ्या खासगी रुग्णालयांविरोधात प्रशासन कडक पावले उचलत आहे. शहरामध्ये करोनाबाधितांची संख्या वाढत आहे. “बेडस् उपलब्ध असूनही रुग्णांना बेड मिळत नाहीत’. “जास्त बिलाची आकारणी करण्यात येते’ अशा अनेक तक्रारी महापालिका प्रशासनाकडे आल्या आहेत. त्यामुळे प्रशासनाने आता कारवाईला सुरुवात केली आहे.
– रुबल अग्रवाल, अतिरिक्त आयुक्त, मनपा