त्या मुळे आज मार्केटयार्ड बंदच.
PRESS MEDIA LIVE : पुणे : मोहम्मद जावेद मौला :
पुणे – शहरातील लॉकडाऊनमधील निर्बंध रविवारी काही प्रमाणात शिथिल होणार आहेत. जीवनावश्यक वस्तूंची दुकाने, भाजीपाला, चिकन, मटण विक्रीची दुकाने उघडण्याची मुभा प्रशासनाने दिली आहे. त्यामुळे मार्केट यार्डातील मुख्य भाजीपाला बाजार रविवारपासून सुरू होण्याची शक्यता होती. मात्र, मार्केट यार्डाचे कामकाज सुरू करण्याबाबतचा कोणताही निर्णय जिल्हा प्रशासनाने दिला नाही. त्यामुळे रविवारी भाजीपाला बाजार बंदच राहणार आहे.याबाबत बाजार समितीचे प्रशासक बी. जे. देशमुख म्हणाले, “अद्याप कोणताही निर्णय घेण्यात आला नाही. त्यामुळे रविवारी मार्केट यार्डातील मुख्य भाजीपाला बाजार बंद ठेवण्यात येणार आहे. प्रशासनाने मार्गदर्शक सूचना दिल्यानंतर बाजार सुरू करण्याबाबतची कार्यवाही केली जाईल. यासाठी वेळ निश्चित करणे गरजेचे आहे. प्रशासनाने निर्णय दिल्यानंतर बाजार घटकातील आडते, व्यापारी, कामगार वर्गाबरोबर चर्चा करून मार्केट यार्ड सुरू करण्यात येईल.’