पुणे : मार्केट यार्ड बाजार .


पुणे : मार्केट यार्ड मध्ये नागरिकांची झुंबड.
.                     
वाहतुकीचे मोठी कोंडी झाली.



PRESS MEDIA LIVE :. पुणे : ( मोहम्मद जावेद मौला. ) :

 लॉकडाऊनच्या पार्श्‍वभूमीवर घरगुती ग्राहक, किरकोळ विक्रेत्यांनी मार्केट यार्डातील फळे-भाजीपाला विभागात गर्दी केली होती. परिणामी, सोशल डिस्टनिंगचा फज्जा उडाला. त्याबरोबरच मार्केट यार्ड परिसरात मोठी वाहतुक कोंडी झाली होती. या कोंडीतून मार्ग काढत जाताना नागरिकांना मोठी कसरत करावी लागली. गर्दी होणार हे लक्षात घेऊन बाजार समितीचे बाजार समितीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नियोजन केले होते.  कोरोना संसर्गाच्या पार्श्‍वभूमीवर शहरात सोमवारी (दि.13) मध्यरात्रीपासून जिल्हा प्रशासनाने दहा दिवसांसाठी लॉकडाऊन घोषित केले आहे. रविवारची असलेली सुट्टी, लॉकडाऊन वाढण्याची भीती आणि लॉकडाऊन काळात पुरेल एवढा भाजीपाला खरेदी करण्यासाठी सकाळी सातपसूनच गर्दी केली होती. तर, शहरात किरकोळ विक्रेत्यांकडून मोठ्या प्रमाणात भाजीची खरेदी करण्यात येत आहे. त्यामुळे आज (रविवारी) आणि उद्या (सोमवार) विक्री करण्यासाठी किरकोळ विक्रेत्यांनीही मोठ्या प्रमाणात मार्केट यार्डात हजेरी लावली.

परिणामी, मार्केटयार्डातील शिवनेरी रस्त्यावरील वखार महामंडळापासून ते सातारा रस्त्यापर्यंत वाहतुक कोंडी झाली होती. या रस्त्यावरून गाडी अथवा चालत जाणेही मुश्‍कील बनले होते. तर फळ बाजारातही चांगला उठाव होता. घरगुती ग्राहक लॉकडाऊनच्या घरात खाण्यासाठी फळांना मोठ्या प्रमाणात खरेदी केली. किरकोळ विक्रेत्यांकडूनही चांगली मागणी होती. गर्दी पांगवण्यासाठी बाजार समिती प्रशासनाकडून प्रयत्न करण्यात येत होते.

परिसरात गर्दी करू नये, यासाठी अधिकाऱ्यांकडून नागरिकांना ठिक-ठिकाणी सुचना देण्यात येत होत्या. दरम्यान महात्मा फुले मंडईसह शहरातील विविध किरकोळ बाजार आणि किरकोळ विक्रेत्यांकडेही खरेदीसाठी नागरिकांनी गर्दी केली होती.

Post a Comment

Previous Post Next Post