दहा दिवसाच्या लॉकडाऊन मध्ये
खरंच प्रशासनाला संसर्गाची साखळी तोडण्यात यश आलय का...?
PRESS MEDIA LIVE : पुणे : (मोहम्मद जावेद मौला ) :
राज्याचा 3.75 टक्के तर मुंबईचा 5.61 टक्के इतका आहे. यावरून लॉकडाउन कालावधीत कोरोनाबाधितांची संख्या वाढलेली दिसत असली तरी याचं एक महत्त्वाचं कारण वाढलेल्या चाचण्या आहे. तसंच रुग्णांवर वेळेवर उपचार होत असल्याने मृत्यदरही कमी झाला आहे. लॉकडाउनमुळे रुग्ण संख्या घडेल हा दावा मात्र, फोल ठरला आहे. कोरोनाच्या काळात धक्कादायक आला समोर, 50 मृतदेहांवर सामूहिक अंत्यसंस्कार
दरम्यान, पिंपरी आणि थेरगाव परिसरात घोषित करण्यात आलेल्या कंटेन्मेंट झोनमध्ये केवळ अत्यावश्य सेवेची दुकानं 8 ते दुपारी 12 पर्यंतच उघडी असणार आहेत. तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या मुक्त वावरावर निर्बंध असतील हा आदेश आज मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असेल अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला असला तरी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे. दरम्यान, पुढील शनिवार आणि रविवारी कडक लॉकडाऊन ठेवा, व्यापाऱ्यांनी केलेल्या या मागणीवर प्रशासन विचार करत असल्याचं पुणे महानगरपालिकेचे आयुक्त विक्रमकुमार यांनी सांगितलं आहे.
पिंपरी आणि थेरगाव परिसरात फक्त 4 तास उघडणार दुकानं तसंच कंटेन्मेंट झोनमध्ये नागरिकांच्या मुक्त वावरावर निर्बंध असतील हा आदेश आज मध्यरात्रीपासून पुढील आदेशापर्यंत लागू असेल अशी माहिती सहायक आयुक्त स्मिता झगडे यांनी दिली आहे. त्यामुळे लॉकडाऊन जरी संपला असला तरी 31 जुलैपर्यंत पुणेकरांना नियमांचं पालन करणं आवश्यक आहे.