पुणे लॉक डाऊन :



पुणे लॉकडाऊनला पहिल्याच दिवशी नागरिकातून उत्स्फूर्त प्रतिसाद.  सर्वत्र तर कडकडीत बंद.


PRESS MEDIA LIVE : पुणे :
( मोहम्मद जावेद मौला ) :

पुणे - शहरातील करोना नियंत्रणासाठी पालकमंत्री अजित पवार यांनी जाहीर केलेल्या दहा दिवसांच्या लॉकडाऊनमध्ये पहिल्याच दिवशी नागरिकांनी स्वयंशिस्तीने कडकडीत टाळेबंदी स्वीकारली. रस्त्यावर फक्त अत्यावश्‍यक सेवा आणि सवलत दिलेल्या खासगी व सरकारी कार्यालयाचे कर्मचारी ओळखपत्र घेऊन बाहेर पडले होते. विनाकारण फिरणाऱ्यांवर पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला. शहरात ठिकठिकाणी अडथळे उभारून गल्लीबोळातील रस्ते सील करण्यात आले होते. वाहन चालकांसाठी फक्‍त मुख्य रस्ते खुले ठेवले होते.

मुख्य रस्त्यांवरील चौकाचौकात बॅरिकेडस उभारुन नागरिकांची तपासणी पोलीस करीत होते. पण, ही स्वयंशिस्त नागरिक आणखी किती दिवस पाळतात हे जुलैअखेरीस करोनाच्या संसर्गाचा धोका वाढण्याची शक्‍यता साथरोग तज्ज्ञांनी व्यक्त केल्यानंतर शहरात रुग्णसंख्या वाढल्याचे दिसून आले. त्यामुळे सोमवार रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर केला गे लेल्या
पुण्यासह जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून करोनाच्या रुग्णांची संख्या एक हजाराच्या पुढेच आढळत आहे. त्यात मृतांची संख्याही वाढत आहे. त्या पार्श्‍वभूमीवर करोनाच्या रुग्णांची साखळी तोडण्याच्या हेतुने पुण्याचे पालकमंत्र्यांनी सोमवार रात्रीपासून लॉकडाऊन जाहीर केले आहे. या पार्श्‍वभूमीवर दीर्घ कालावधीच्या लॉकडाऊनमुळे पूर्वपदावर येणारी अर्थव्यवस्था पुन्हा कोलमडण्याची भीती व्यक्त करून व्यापाऱ्यांसह हातावर पोट असलेल्या व्यावसायिकांनी या निर्णयाला विरोध केला आहे. मात्र, आज पहिल्या दिवशी सर्व व्यापारी बाजारपेठा, मेडिकल, दूध विक्रेते वगळता सर्व दुकाने बंद होती. शहराच्या मध्यवर्ती भागा बरोबरच उपनगरांतही कडकडीत बंद दिसून आला.

दिवसा 105 आणि रात्री 55 ठिकाणी नाकाबंदी…
पोलिसांनी शहरात दिवसा 105 ठिकाणी आणि रात्री 55 ठिकाणी नाकाबंदी केली. लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन केल्याप्रकरणी भादवी 188 प्रमाणे 253 जणांवर कारवाई करण्यात आली. तर 236 वाहने जप्त करण्यात आली. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या 73 जणांना नोटिसा देण्यात आल्या तर मास्क न घालणाऱ्या 31 जणांवर कारवाई केली .

Post a Comment

Previous Post Next Post