बकरी ईद च्या दिवशी आझम कॅम्पस मशिदीत ' नमाज' चे 'फेसबुक लाईव्ह' पठण
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर निर्णय.
PRESS MEDIA LIVE. :. पुणे. :. प्रतिनिधी
येथे दर आठवड्यात शुक्रवारी दुपारी दीड जुम्मा नमाझचे फेसबुक लाईव्ह द्वारे पठण करण्यात येते.आझम कॅम्पस शैक्षणिक,सामाजिक परिवाराचे अध्यक्ष डॉ.पी.ए.इनामदार यांनी पत्रकाद्वारे या उपक्रमाची माहिती दिली. आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद नमाज पठण करणार आहेत तर आझम कॅम्पस च्या माहिती तंत्रज्ञान विभागाचे प्रमुख अमीन शेख यांनी तांत्रिक बाजू सांभाळणार आहेत.
मशिदीच्या पेश इमाम यांच्या मार्गदर्शना खाली घरी नमाज पठण करणे नव्या तंत्रज्ञानाच्या वापराने शक्य झाले असून २९ मे पासून हा उपक्रम दर शुक्रवारी सुरु आहे. अशा स्वरूपाचा हा पहिलाच उपक्रम आहे.या तंत्रामुळे मशिदीत गर्दी होत नाही,फक्त पेश इमाम मशिदीतून नमाज पठण करतात आणि इतरांना घरातून त्यात सहभागी होणे शक्य होते.दर शुक्रवारी दुपारी दीड वाजता हा उपक्रम होतो.
एरवी शहराच्या विविध भागात मशिदींमध्ये शुक्रवार (जुम्मा) दिवशी सामूहिक नमाज पठण केले जाते.कोरोना संसर्गचा धोका लक्षात घेऊन शुक्रवारी मशिदीत जाता येत नाही. त्या सर्वांना या फेसबुक लाईव्ह नमाज पठणाचा लाभ होत आहे.आझम कॅम्पस या फेसबुक पेज वर हे लाईव्ह प्रक्षेपण करण्यात येते.प्रशासनाने दिलेल्या सर्व सूचनांनुसार सोशल डिस्टन्स चे नियम पाळण्यात येतात. पुढील लिंक द्वारे या नमाज पठणात सहभागी होता येते. https://www.facebook.com/azamcampus1922
कोरोना साथीच्या पार्श्वभूमीवर रमजान ईद च्या दिवशी देखील सकाळी ८ वाजता आझम कॅम्पस मशिदीमध्ये पेश इमाम असलेले मौलाना नसीम अहमद यांनी ईद साठीचे नमाज पठण केले होते.नेहमीच्या शिरस्त्या प्रमाणे सुरुवातीला नमाज पठण कसे करायचे याचे मार्गदर्शन करण्यात आले.मग,ईद -उल -फित्र ची नमाज अदा करण्यात आली.त्यानंतर थोडक्यात खुतबा पढण्यात आला आणि दुआ सांगण्यात आली.पेश इमाम यांच्या पाठोपाठ हे लाईव्ह प्रक्षेपण पाहणाऱ्या बांधवानी घरी नमाज अदा केली. सुमारे ५ हजार बांधवांनी हे प्रक्षेपण सकाळच्या वेळी पाहिले होते.
----