‘वजन’दार व्यवसायाला कोरोना मुळे आली अवकळा.
फिटनेस क्लब असोसिएशनची शासनाकडे धाव
PRESS MEDIA LIVE : पुणे : ( मोहम्मद जावेद मुल्ला ) :
लॉकडाऊनमध्ये जिम आणि फिटनेस क्लब व्यवसायदेखील बंद होता. त्यानंतर जून महिन्यात लॉकडाऊनचे नियम शिथिल करण्यात आले. मात्र, तरीही या व्यवसायाला परवानगी मिळालेली नाही. त्यामुळे जिम आणि फिटनेस व्यवसयाशी संबंधित व्यावसायिकांमध्ये नाराजी निर्माण झाली आहे. याबाबत अससोसिएशनचे अध्यक्ष नीलेश काळे, उपाध्यक्ष रुपेश चव्हाण, सचिव कौस्तुभ शेडगे, सभासद मनीष पटवर्धन, संजीवनी चिवटे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे भाडे माफी, वीज बिल माफी, व्यवसायासाठी अनुदान, सहज कर्ज योजना, नंतरच्या काळात फिटनेस व्यवसायसाठी चालना मिळावी, म्हणून सरकारने जाहिरातबाजी स्वखर्चाने करावी अशी मागणी केली आहे. तसेच व्यवसाय सुरू करण्यासाठी परवानगी न दिल्यास साखळी उपोषणाचा इशारा दिला आहे.