पुणे : करोनाचे थैमान.

पुणे शहरात करोनाचे थैमान सुरूच.

पुण्यात करोना साथीचा उद्रेक : बाधितांची संख्या सहा हजारांवर.


PRESS MEDIA LIVE :. पुणे :. मोहम्मद जावेद मौला :

पुणे शहरात करोनाचे थैमान सुरूच असून, ढोले पाटील रस्ता आणि कसबा-विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीतील बाधितांची एकूण संख्या 6 हजारांच्या घरात पोहोचली आहे. शहरातील 6 क्षेत्रीय कार्यालयांच्या हद्दीत अडीच हजारांवर बाधितांची संख्या असून, उर्वरित 7 परिसरांतील बाधितांचा आकडा हजार ते 2 हजारांच्या घरात आहे.  शहरात आतापर्यंत सर्वाधिक म्हणजेच 3,014 करोनाबाधित ढोले-पाटील रस्ता हद्दीत सापडले असून, सर्वांत कमी म्हणजेच 1023 बाधित औंध-बाणेर हद्दीत सापडले आहेत. तर, महापालिकेच्या हद्दीबाहेरील बाधितांचा आकडाही तब्बल 2,800 पेक्षा अधिक असल्याचे आकडेवारीतून समोर आले आहे.

स्मार्ट सिटी प्रशासनाने जाहीर केलेल्या आकडेवारीनुसार, कसबा- विश्रामबागवाडा क्षेत्रीय कार्यालयाच्या हद्दीतील करोनाबाधितांची संख्या सुमारे 2,991 वर पोहोचली आहे. तर प्रभाग क्रमांक 20 ताडिवाला रस्ता-ससून हॉस्पीटल या प्रभागात 1,557 बाधित आहेत. तर, शहरातील सर्वाधिक कमी बाधित प्रभाग-9 बाणेर-बालेवाडी-पाषाण हा असून, येथे आतापर्यंत 288 संसर्गित व्यक्‍ती सापडल्या आहेत, असे या आकडेवारीतून समोर आले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post