माजी विरोधी पक्षनेते, व राष्ट्रवादीचे नगसेवक दत्ता साने यांचे हृदयविकाराने निधन.
PRESS MEDIA LIVE : पिंपरी चिंचवड :
माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादीचे नगरसेवक दत्ता साने यांचं हृदय विकाराच्या झटक्यानं निधन झालं आहे. दत्ता साने यांना कोरोनाची लागण झाल्यानं त्यांच्यावर सुरू होते. पहाटे 5 वाजताच्या सुमारास चिंचवड इथल्या खासगी रुग्णालयात निधन झालं आहे. साने यांना 25 जून रोजी कोरोनाची लागण झाली होती. दत्ता साने हे पिंपरी-चिंचवड महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेते, राष्ट्रवादी काँग्रेसचे विद्यमान नगरसेवक अशी त्यांची राजकारणात ओळख होती. दत्ता साने यांच्या अशा जाण्यामुळे राष्ट्रवादीत मोठी शोककळा पसरली आहे. साने यांच्या निधनाबाबत पिंपरी चिंचवड महापालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर यांनी माहीती देतांनाच दुःख व्यक्त केलं.