पिंपरी: राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांचे निधन

राष्ट्रवादीचे विद्यमान नगरसेवक जावेद शेख यांचे निधन



 PRESS MEDIA LIVE. :.  पिंपरी :

पिंपरी – राष्ट्रवादी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नगरसेवक जावेद शेख यांचे आज उपचारादरम्यान निधन झाले. पुण्यातील एका खासगी रुग्णालयात उपचार सुरू असताना त्यांची प्राणज्योत मालवली. दत्ताकाका साने यांच्यानंतर धडाडीची तोफ म्हणून ओळख निर्माण करणाऱ्या जावेद शेख यांच्या मृत्यूमुळे राष्ट्रवादीला पंधरा दिवसांत हा दुसरा मोठा झटका बसला आहे.

राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या ज्येष्ठ नगरसेवकांपैकी एक असलेल्या जावेद शेख यांचा १५ जुलै रोजीचा करोना रिपोर्ट पॉझिटिव्ह आला होता. त्यानंतर त्यांना आकुर्डीतील एका खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. परंतु त्यांच्या प्रकृतीमध्ये सुधारणा न झाल्याने त्यांना पुढील उपचारासाठी पुण्यातील खासगी रुग्णालयात दाखल केले होते. दरम्यान त्यांची पुन्हा ३० जुलै रोजी केलेली करोना चाचणी निगेटिव्ह आली होती. मात्र उपचारादरम्यान त्यांची प्रकृती खालवल्याने शुक्रवारी (दि. ३१) सायंकाळी पाचच्या सुमारास निधन झाले.

जावेद शेख यांच्या लढवय्या वृत्तीमुळे त्यांनी करोनावर यशस्वी मात केली होती. मात्र, त्यांची प्रकृती खालवल्याने आज (शुक्रवारी) पाचच्या सुमारास त्यांचे निधन झाले. जावेद शेख यांच्या जाण्यामुळे राष्ट्रवादीला आणखी एक मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

Post a Comment

Previous Post Next Post