पणदूर जिल्हा सिंधुदुर्ग.

पणदूर गावातील कोरोना योद्धाना मिळाले पावसापासून संरक्षण करण्यासाठी रेनकोट...


PRESS MEDIA LIVE ; 

कोरोना च्या वैश्विक महामारीत गेले 3 महिने सातत्याने कोरोना रोगापासून पणदूर गावच संरक्षण करण्यासाठी अहोरात्र मेहनत करणाऱ्या  ग्रामपंचायतीच्या कर्मचाऱ्यांना पणदूर गावचे रहिवाशी आणि मुंबई पोलीस मध्ये कार्यरत असणारे श्री नवनीत पांडुरंग सावंत यांनी सरपंच दादा साईल यांच्या कडे मोफत रेनकोट पुरविले होते त्याचे नुकतेच वाटप ग्रामपंचायत येथे सरपंच दादा साईल व ग्रामपंचायत सदस्य यांच्या उपस्थितीत ग्रामपंचायतच्या सभागृहात करण्यात आले यावेळी ग्रामपंचायत कर्मचाऱ्यांच्या वतीने नवनीत पांडुरंग सावंत आपल्या मोलाच्या सहकार्या बद्दल  आभार व्यक्त करण्यात आले. यावेळी सरपंच दादा साईल उपसरपंच आबा सावंत, ग्रामपंचायत सदस्य शिवराम पणदूरकर, किरण मोरे, सुविधा सावंत, अनघा गोडकर, अंकिता राऊळ तसेच ग्रामसेवक बी व्ही सूद, आणि ग्रामपंचायत कर्मचारी काशीराम साईल, पूनम साईल, दत्तात्रय गोसावी, सुदेश साईल उपस्थित होते

Post a Comment

Previous Post Next Post