कुडाळ :

सरसकट लॉकडाउन च्या नावाखाली जिल्हा प्रशासन स्वतःच अपयश झाकू पहातंय..!

राज्य सरकारच्या नियोजनशून्य कारभारामुळे जनता वारंवार वेठीस- मनसे तालुकाध्यक्ष प्रसाद गावडे


PRESS MEDIA LIVE :   कुडाळ :

सिंधुदुर्ग जिल्ह्यात 2 जुलै ते 8 जुलै सरसकट संचारबंदी आणून जिल्हा प्रशासन स्वतःच अपयश झाकू पहातंय.जवळपास 3 महिने प्रामाणिकपणे संचारबंदीचे नियम पाळून कोरोना लढ्यात प्रशासनाला सर्वोत्तपरी सहकार्य करणाऱ्या जनतेला आता मात्र गृहीत धरलं जातंय हे जिल्हावासीयांचे दुर्दैव आहे.लोकडावन हे एकमेव कोरोनावर औषध असल्याचे प्रशासन भासवत आहे.वास्तविक याआधीच्या संचारबंदी काळात भविष्यातील अनलॉक बाबत सरकारकडून ठोस नियोजन करणे अभिप्रेत असताना संपूर्ण वेळ फक्त भाषणबाजीत व सहानुभूती मिळवण्यात घालवला परिणामी सर्वसामान्य जनता आज सततच्या बंदीने भरडली जातेय.रोजंदारी कामगारांची रोजी रोटी बंद झाली,व्यवसाय ठप्प झाले काही बुडालेच,लोकांच्या नोकऱ्या गेल्या,कामगारांचे पगार मिळत नाहीत याबद्दल एकही मंत्री चकार शब्द काढायला तयात नाही.रेशनवरील मोफत 5 किलो तांदूळ व अल्प दरात डाळ तांदूळाने जनता सुशेगात जीवन जगतेय असा भ्रम राज्यकर्त्यांना झालाय की काय असे वाटू लागले आहे.मुळात विलगिकरणातील व्यक्तींवर नियंत्रण राखण्यात प्रशासन अपयशी ठरल्याने जिल्ह्याला पुन्हा कडक संचारबंदीला समोर जावं लागतं आहे ही खरी वस्तुस्थिती आहे.याआधी जिल्हा प्रशासनातील संचारबंदी उल्लंघन केलेल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांवर काय कारवाई केली ते जनतेसमोर मांडा. जिल्हा आरोग्य प्रशासनातील असंख्य गंभीर चुका दाखवून देखील त्यावर पालकमंत्री महोदयांनी फक्त बघ्याची भूमिका घेतली त्याचेच पुनः लोकडावन हे फलित आहे.सर्वसामान्य जनतेला वारंवार वेठीस धरणं बंद करा नाहीतर उद्रेक होऊन परिस्थिती हाताबाहेर जायला वेळ लागणार नाही .

Post a Comment

Previous Post Next Post