कोल्हापूर : लॉकडाऊनच्या नियमात जिल्हाधिकार्यांकडून दुरुस्ती.
PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर : भरत घोंगडे.
कोल्हापुरात सोमवारपासून काय चालू काय बंद राहणार याबाबत जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी दुरुस्ती आदेश काढला आहे. यानुसार ग्रामीण भागातील उद्योगधंदे 50% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू राहणार आहेत. बँकेची मुख्य कार्यालय मर्यादित कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत लॉकडाऊन काळात सुरू राहतील. संकलित केलेले दूध वाहतूक करण्यासाठी कोणतीही वेळेची मर्यादा नसणार आहे.
जिल्हाधिकाऱ्यांनी रविवारी सायंकाळी हा दुरुस्ती आदेश काढला. यापूर्वी ग्रामीण भागातील एमआयडीसी तसेच खासगी औद्योगिक वसाहतीतील उद्योग 25% कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत सुरू ठेवण्यास परवानगी दिली होती.