कोल्हापूर : दूध दर वाढआंदोलन वरून राजकीय वातावरण तापू लागले.

दूध दरवाढ आंदोलन वरून,
राजकीय वातावरण तापू लागले.


PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर : 
( प्रतिनिधी ) :
दूध दरवाढीच्या आंदोलनावरून स्वाभिमानी शेतकरी संघटना आणि भाजप आमने-सामने आले आहेत. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने मंगळवारी दुधाला पाच रुपये अनुदान देण्याची मागणी करत दूध बंद आंदोलन पुकारले. या आंदोलनाला गोकूळ दूध संघानेही पाठिंबा देत शेट्टींना बळकटी दिली. त्यामुळे भाजपनेही आंदोलन हाती घेत शेट्टींपेक्षा पाच रुपये ज्यादा म्हणजे 10 रुपये अनुदान देण्याची मागणी केली. मात्र भाजपचे हे आंदोलन केवळ स्टंटबाजी असल्याची टीका राजू शेट्टी यांनी केली. शेतकऱ्यांचा एवढाच कळवळा असेल तर केंद्र सरकारच्या विरोधात आंदोलन करावे. या आंदोलनात आपणही सहभागी होऊ, असा टोला त्यांनी लागवला.

दूध दरावरून आज राज्यात चांगलच वातावरण तापले असून सत्ताधारी वगळता सर्वच राजकीय पक्षांनी हे आंदोलन हाती घेतले आहे.यापैकी स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्या आंदोलनाला पाठिंबा देऊन गोकूळ संकटात सापडले असून गोकूळच्या या भूमिकेने पश्‍चिम महाराष्ट्राचे राजकारण चांगलेच तापले आहे.  राज्यात चार महिन्यांपासून करोनामुळे लॉकडाउन असल्याने सर्व उद्योगांसह हॉटेलही बंद आहेत. यामुळे दूध व दुग्धजन्य पदार्थांना मागणी नसल्याने दूध संघ कमी दराने दूध खरेदी करीत आहेत. यामुळे हा व्यवसाय अडचणीत आला आहे. दुधाला दर मिळत नसल्यामुळे दूध उत्पादक प्रतिलिटर अनुदान द्यावे, अशी मागणी करत आहेत.

दूध दराबाबत आज मंत्रालयात बैठक
दुधाचे दर घटल्यामुळे दूध दरप्रश्नी चर्चा करण्यासाठी उद्या (मंगळवारी) दुग्ध व्यवसाय विकास मंत्री सुनिल केदार यांच्या अध्यक्षतेखाली मंत्रालयात बैठक बोलावली आहे. या बैठकीस महानंदचे अध्यक्ष, दुग्ध व्यवसाय विभागाचे प्रधान सचिव, आयुक्त, विविध शेतकरी संघटनांचे प्रमुख, विविध दूध संघांचे अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक उपस्थित राहणार आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post