सोमवार पासून कोल्हापूर जिल्ह्यात सात दिवसांचा लॉकडाऊन घोषित.
PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :
कोरोना च्या वाढत्या प्रसारामुळे आज ग्रामविकास मंत्री ना. हसन मुश्रीफ साहेब , सार्वजनिक आरोग्य राज्यमंत्री ना. राजेंद्र पाटील यड्रावकर तसेच कोल्हापूर जिल्ह्यातील सर्व लोकप्रतिनिधी, सर्व राजकीय पक्षांचे प्रमुख, प्रशासकीय अधिकारी यांच्यासोबत व्हिडीओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून चर्चा केल्यानंतर कोल्हापूर जिल्ह्यात येत्या सोमवार पासून सात दिवसांचा लॉकडाऊन करण्याचा निर्णय जिल्हा प्रशासनाने घेतला आहे.
कोल्हापूर शहरासह संपूर्ण जिल्ह्यामध्ये दिवसेंदिवस कोरोनाचे नवे रुग्ण आढळत असल्याने थोडीशी चिंता वाढली आहे. या संकटावर लवकरात लवकर मात करण्यासाठी प्रशासन सर्वतोपरी प्रयत्नशील आहे. परंतु, जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून खबरदारी घेणे गरजेचे आहे. सोशल डिस्टसिंगचे नियम योग्य पद्धतीने व काटेकोरपणे पाळणे अत्यंत आवश्यक आहे.
सर्वजण प्रयत्न करूया, कोरोना संकटाचा मुकाबला करूया !
- *ना. सतेज (बंटी) डी. पाटील*
*पालकमंत्री, कोल्हापूर*