श्री क्षेत्र नृसिंहवाडीत शुकशुकाट; कोरोना मुळे
यंदा भाविकांविना ही गुरुपौर्णिमा उत्सव.
PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर :
कोल्हापूर जिल्ह्यातील श्री क्षेत्र नृसिंहवाडी येथील दत्त मंदिरात गुरुपौर्णिमा उत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत असतो मात्र यंदा कोरोनाच्या संकटामुळे हा उत्सव यंदा भाविकांविना साजरा होत आहे. सध्या श्री क्षेत्र नृसिंहवाडी मंदिर परिसरातील सर्व दुकाने बंद असून शुकशुकाट पसरलेला आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर नृसिंहवाडीतील दत्त मंदिर मार्च महिन्यापासून भाविकांना दर्शनासाठी बंद करण्यात आलं होतं ते आज अखेर बंदच आहे. त्यामुळे आज गुरुपौर्णिमा असूनही भक्तांना दर्शन घेता येत नाही.
गुरुपौर्णिमा असल्याने दर्शनसाठी भाविक येण्याची शक्यता असल्याने या परिसरात पोलिसांनी बंदोबस्त देखील ठेवला असून दत्त मंदिरातील सर्व पूजा अर्चा या विधीवत पार पडल्या आहेत.यामध्ये धुपारती, अलंकारिक पूजा…आरती याचा समावेश आहे. मात्र यंदाची गुरुपौर्णिमा भक्तांविना साजरी होत आहे