पत्रकार ङाॅ .राजेंद्र सूर्यवंशी यानां मानवाधिकार सूरक्षा संघाचा कोविङ योद्धा सन्मानाने सन्मानित.
कोरोना या विषाणूचा प्रसार दिवसेंदिवस वाढतच चाललाय.आरोग्य यंत्रणेबरोबरच काही सामाजिक संस्था,समाजसेवक आपापल्या गावाची काळजी घेत आहेत.करवीर तालुक्यातील तामगाव येथील समाजसेवक पत्रकार यांनी आपल्या गावाची विशेष काळजी घेतली. कोरोना कालावधीमध्ये गावाची काळजी घेऊन इतर गावांसमोर एक आदर्श निर्माण करून दिला आहे.त्यांच्या कार्याची दखल घेऊन मानवाधिकार सुरक्षा संघ ,दिल्ली यांनी सन्मानित केले आहे.त्यांचा सत्कार ए. पी. आय सुशांत चव्हाण,पी. एस. आय रविद्रं गच्चे ,जिल्हाध्यक्ष कोल्हापूर मानवाधिकार सुरक्षा संघ सुभाष भोसले यांचे हस्ते संपन्न झाला.डॉ राजेंद्र सूर्यवंशी यांनी मानवाधिकार संघाचे पदाधिकारी विवेक आनंद ओबेरॉय प्रमुख संरक्षक मानवाधिकार सुरक्षा संघ,प्रदेशाध्यक्ष अफसर शेख,पुष्कर सराफ प्रदेश महासचिव,,कमलेश शेवाळे प्रदेश कार्यवाह,वजीरभाई शेख प्रदेश संपर्क प्रमुख कोल्हापूर जिल्हाध्यक्ष सुभाष भोसले तसेच सर्व पदाधिकारी मानवाधिकार सुरक्षा संघ आदी मान्यवरांचे आभार मानले.
यावेळी महाराष्ट्र माझा पश्चिम महाराष्ट्र ब्युरो चीफ तुकाराम पाटील, महाराष्ट्र पत्रकार असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष गोरख कांबळे, ग्राहक पंचायत सदस्य धनंजय चवई,महाराष्ट्र माझा ब्युरो चीफ सुभाष भोसले, मोहन सातपुते (पत्रकार दैनिक लोकमत), प्रकाश पाटील (पत्रकार दैनिक सकाळ), प्रकाश नलावडे (पत्रकार दैनिक सकाळ), महादेव वाघमोडे (पत्रकार दैनिक सकाळ),व प्रदीप व्यवहारे (पत्रकार दैनिक पुण्यनगरी)व पदाधिकारी यावेळी उपस्थित होते.