इचलकरंजीत कोरोना रुग्णांच्या संख्येत होत आहे झपाट्याने वाढ.
लॉक डाऊन कडक करण्याची ची नगराध्यक्षा अलका स्वामी यांची जिल्हाधिकार्यांकडे मागणी.
PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर : ( मनु फरास ) :
यावेळी अलका स्वामी म्हणाल्या, इचलकरंजीत समूह संसर्ग सुरू झाल्याने येथे लॉकडाऊन कडक करणे गरजेचे आहे. अन्यथा मालेगाव आणि भिवंडीसारखी स्थिती होण्याची शक्यता आहे. ई-पासमुळे परजिल्ह्यांतून नागरिक येत असल्याने धोका अधिक आहे. खासदार धैर्यशील माने यांनी, शहरात सद्य:स्थितीत लॉकडाऊनशिवाय पर्याय नाही; त्यामुळे सगळ्यांची मागणी लक्षात घेऊन नियमांची कडक अंमलबजावणी करावी. या काळात रॅपिड टेस्ट कराव्यात, अशी सूचना दिली; तसेच रुग्णाचा अहवाल येण्यापूर्वीच सीपीआरने मृतदेह नातेवाइकांच्या ताब्यात देणे ही गंभीर चूक असल्याचा आरोप केला. यावर हर्षला वेदक यांनी मृतदेह ताब्यात दिल्याने संसर्ग वाढला नसल्याचे सांगितले.
आमदार प्रकाश आवाडे यांनी शहरात नऊ कंटेन्मेंट झोन असूनही तेथे लॉकडाऊन नियमांची कडक अंमलबजावणी होत नसल्याचे निदर्शनास आणून दिले. यानंतर जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी सगळ्या सूचनांचा विचार करून निर्णय घेऊ, असे सांगितले.
Tags
Breaking News