इचलकरंजीत कोरोनाचा विस्तार वाढतच चालला.
पॉझिटिव रुग्णांमध्ये बड्या नेत्याचा मुलगा नातू असल्याने सर्वत्र खळबळ.
PRESS MEDIA LIVE : कोल्हापूर इचलकरंजी : मनु फरास.
कोल्हापूर जिल्ह्यात काल रात्री उशिरा १० रुग्णांचे अहवाल कोरोना पॉझिटीव्ह आले. यामध्ये कोल्हापूर शहरातील ७ आणि इचलकरंजीचा दोघांचा समावेश आहे. तर जिल्ह्याबाहेरील एक रुग्ण आहे. पॉझिटिव्ह रुग्णांमध्ये इचलकरंजीतील एका बड्या नेत्याचा मुलगा आणि नातू असल्याने खळबळ उडाली आहे. यामुळे इचलकरंजीत कोरोनाचा फैलाव थांबता थांबेना असे चित्र आहे. कोल्हापुरात सात तर इचलकरंजीत 5 नवे रुग्ण विशेष म्हणजे संबंधित नेत्याने काल सोशल मीडियावर मेसेज टाकून ते व त्यांचे कुटुंबीय १४ दिवसांसाठी क्वारंटाईन होत असल्याचे कळविले होते.कोरोनाचा प्रसार वेगाने होत असून घरीच रहा, असे आवाहन देखील त्यांनी केले होते. सध्या बड्या नेत्याचा मुलगा आणि नातू यांच्यावर कोल्हापूर येथील खासगी हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. यामुळे इचलकरंजी शहराची कोरोना बाधित रुग्णांची संख्या ५३ वर पोहोचली आहे. लोकप्रतिनिधीच्या घरातच कोरोना पोहोचल्याने प्रशासन शहरासाठी कोणता निर्णय घेते याकडे लक्ष लागले आहे.
दरम्यान, इचलकरंजीच्या एका महिलेचा शुक्रवारी रात्री ११.३० वाजता कोरोनामुळे मृत्यू झाला. यामुळे इंचलकरजीतील कोरोना मृत्यू संख्या चारवर पोहोचली आहे. २ जुलै पासून सीपीआरमध्ये या महिलेवर उपचार सुरु होते. गेल्या आठवडाभर इचलकरंजीत कोरोनाचा धुमाकूळ सुरू आहे. समूह संसर्गाचा धोका वाढल्याने इचलकरंजीसह शहापूर, कबनूर, चंदूर, तारदाळ, खोतवाडी या गावांत दहा दिवस कडक लॉकडाऊन करण्याचे आदेश जिल्हाधिकारी दौलत देसाई यांनी शुक्रवारी दिले. दि. ४ ते १३ जुलै पर्यंत हा आदेश लागू राहणार आहे. या कालावधीत लग्न, साखरपुडा असे कोणतेही कार्यक्रम करता येणार नाहीत तसेच केशकर्तनालये, रिक्षाही बंद ठेवाव्या लागणार आहेत. इचलकरंजी नगर परिषद, शहापूर, कबनूर, चंदूर, तारदाळ, खोतवाडी या परिसरात कोरोनाचे ४६ पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. इचलकरंजी शहरातील कुडचे मळा, दातार मळा, काडापुरे तळ, बाळनगर, जुना चंदूर रोड, गुरुकन्नननगर, बोंगाळे गल्ली, त्रिशूल चौक, कलानगर, रिंग रोड, गोकुळ चौक या भागात कोरोनाबाधित रुग्णाच्या संपर्कात आल्याने कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यातच शहरात गेल्या आठ दिवसांत दोन बळी गेले आहेत. यामुळे शहरात भीतीचे वातावरण आहे.
Tags
Latest News