इचलकरंजी :


      

इचलकरंजी चे माजी आमदार सुरेशराव हाळवणकर यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी निवड.

PRESS MEDIA LIVE :  इचलकरंजी :    (मनु फरास.)

भाजपा प्रदेश सरचिटणीस आणि इचलकरंजीचे माजी आमदार सुरेश हाळवणकर यांची भारतीय जनता पार्टीच्या प्रदेश उपाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. प्रदेश अध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी शुक्रवारी ही निवड जाहीर केली.

प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत दादा पाटील यांनी जाहीर केलेल्या कार्यकारणी मध्ये इचलकरंजी येथील व्यापारी विनोद कांकानी यांची भाजपा प्रदेश व्यापारी प्रकोष्ठचे अध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे. पश्चिम महाराष्ट्र देवस्थान समितीचे अध्यक्ष महेश जाधव, सम्राट महाडिक यांची प्रदेश कार्यकारणी सदस्यपदी तर माजी खासदार धनंजय महाडिक, बाबा देसाई, हिंदुराव शेळके यांची कायम निमंत्रित सदस्यपदी नियुक्ती करण्यात आली आहे.

सुरेश हाळवणकर यांनी भारतीय जनता पार्टीच्या स्थापनेपासून केलेल्या पक्ष विस्तार कार्याची दखल घेत नियुक्ती केली आहे. सुरेश हाळवणकर यांची कारकीर्द विद्यार्थी परिषदेपासून सुरू झाली. पुढे त्यांनी युवा मोर्चा शहराध्‍यक्ष, तसेच भारतीय जनता पार्टी इचलकरंजी शहर अध्यक्ष, भाजपा नगरसेवक, उपनगराध्यक्ष, भारतीय जनता पार्टी कोल्हापूर जिल्हा ग्रामीणचे दोन वेळा अध्यक्ष अशी पदे भूषविली. नोव्हेंबर 2017 पासून ते प्रदेश भारतीय जनता पार्टी चे सरचिटणीस म्हणून काम पाहत होते. कोल्हापूर जिल्ह्यातील भाजपचे जनतेतून निवडून येणारे ते पहिले आमदार होते. सन 2009 ते 2019 अशी 10 वर्षे ते विधानसभा सदस्य म्हणून इचलकरंजी मतदारसंघातून निवडून आले.

RELATED POST

Post a Comment

Previous Post Next Post