बेडकिहाळ येथे वृक्षारोपण करण्यात आले.
PRESS MEDIA LIVE : बेडकिहाळ : विक्रम शिंगाडे बेळगाव जिल्हा प्रमुख प्रतिनिधी :
बेडकीहाळ येथे राजु जोशी यांच्या शुभहस्ते व्रुक्षारोपन करण्यात आले. बेडकीहाळ सर्कल मधुन ते बस स्टॅण्ड पर्यत देशी व्रुक्ष सावली असी एकुन १०० झाडे मा. डॉ. विलास जोशी सर इचलकरंजी यांच्या मार्फत देण्यात आली होती. ती झाडे घेऊन सामाजिक धडाडीचे कार्यकर्ते नितिन वाडेकर ( पर्यावरन प्रेमी) यांनी गावातील थोर मान्यवरांना घेऊन राजु जोशी यांच्या शुभहस्ते रस्त्याच्या दोन्ही बाजूला झाडे लावुन त्याला संरक्षण कुंपन करण्यात आले. त्यामुळे डॉ. विलास जोशी, इचलकरंजी यांचे गावातुन कौतुक होत आहे. हा व्रुक्षारोपनाचा कार्यक्रम नितीन वाडेकर व त्यांचे सहकारी यांच्या नेतृत्वाखाली २ तारखेला सकाळी ९ वा. करण्यात आला. अनेक सामाजिक कार्यकर्ते पाणी,खत,औषध देऊन सहकार्य करण्याचे आश्वासन नितीन वाडेकरांना दिले. त्यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून संदीप पाटील हे होते. तसेच स्वपनिल पाटील, विठ्ठल कोरे, ओंकार शिंदे, अभिजित कुरने,सागर कोरे, महेश बत्ते,भरमु कोरे आदी उपस्थित होते.
Tags
Latest News