बेडकिहाळ येथील कर्तव्य फाउंडेशन तर्फे मास्क व फेस शील्ड किटचे वितरण.
सामाजिक शैक्षणिक धार्मिक कार्यामध्ये मोलाचा सहभाग : कर्तव्य फाउंडेशन
बेडकीहाळ येथील कर्तव्य फांऊडेशन तर्फे सर्व कोरोना योध्यांना फेसशिल्ड किट व मास्कचे वितरन करण्यात आले. कर्तव्य फांऊडेशन ही संस्था कोरोनाच्या संकटातच नव्हे तर गेल्या अनेक वर्षांपासून ही संस्था सामाजिक, धार्मिक, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रांमध्ये यांचा सहकार्याचा मोलाचा वाटा असतो. या संस्थेच्या वतीने अनेक लहान-मोठे उपक्रम राबविले जातात. तसेच या संस्थेच्या माध्यमातून अनेक गरीब गरजू विद्यार्थ्यांना सहकार्य करत असतात. तसेच या संस्थेच्या वतीने दि: जुलै २ रोजी व्रुक्षारोपन करण्यात आले.
बेडकीहाळ मधील पत्रकार, गावातील सर्व संस्थेचे कर्मचारी, नाभिक समाजातील २० दुकानदार, प्राथमिक आरोग्य केंद्राच्या आयुष अधिकारी डॉ.अर्चना कुलकर्णी यांच्या नेतृत्वाखालील २० आरोग्य कर्मचारी, ग्रा.पंचायत पीडीओ. सी.एम.रविकांत यांच्या नेतृत्वाखालील १८ कर्मचारी व सफाई कामगार अशा १४० जनांना फेसशिल्ड व मास्कचे वितरन करण्यात आले.
यावेळी अनिल गोसावी म्हनाले आपला परिसर कोरोना मुक्त राहन्यासाठी कोरोना योध्दा दिवसरात्र परिश्रम घेत आहेत. त्यासाठी त्यांना सुरक्षा मिळावी यासाठी या कर्तव्य फांऊडेशन कडुन मास्कचे व फेसशिल्ड चे वितरन करत असल्याचे सांगितले. त्यावेळी ग्रा.पं अध्यक्षा शारदा जाधव, सदस्य शंकरदादा पाटील, सुकुमार जाधव, प्रशांत पाटील व कर्तव्य फांऊडेशनचे अध्यक्ष शरद जाधव, उपाध्यक्ष मुकुंद सुतार, खजिनदार सुनिल रसाळ, सदस्य भरत कोळी, सागर केसरकर, रविंन्द्र जनवाडे, सचिन शेळके, मल्लिकार्जुन देसाई, अनिल टाकळे, किरण धतोंडे, प्रंशात देसाई, नितीन वाडेकर आदी उपस्थित होते.
Tags
Latest News