सरपंच सेवा महासंघाचे वर्धापन दिनाच्या निमित्ताने सरपंच यांनी केले दोन लाख वृक्षारोपण करून पर्यावरण संवर्धनाचा दिला संदेश.....
PRESS MEDIA LIVE : औरंगाबाद : प्रतिनिधी.
सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्याचे वर्धापन दिनाचे औचीत्यसाधून सरपंच सेवा महासंघाचे पदाधिकारी व सभासद सरपंच यांनी गावोगावी प्रत्येकी 51 ,101 तरी काहींनी 1001असे एकुण राज्यभरात दोन लाख झाडांचे वृक्षारोपण आपापले गावी व ग्रामपंचायत परीसरात केले.
यावेळी राष्ट्रपती पारितोषिक विजेते आदर्श सरपंच मा भास्करराव पेरे पाटील यांचे हस्ते ऑनलाईन राज्यात कोरोनाचे पार्श्वभूमीवर प्रतिबंधक उपाययोजना करणारे राज्यातील 125 सरपंच यांना सरपंच कोवीड योद्धा पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.यावेळी प्रमाणपत्र ऑनलाईन सर्व पुरस्कारार्थींना वितरण केले.
तसेच भास्करराव पेरे पाटील यांचे हस्ते सरपंच सेवा महासंघ महाराष्ट्र राज्य यांचे मोबाईल अॅप व वेबसाईट चे ऑनलाईन उदघाटन करण्यात आले.
वर्धापन दिनाच्या कार्यक्रमाचे नियोजन संस्थापक राज्याध्यक्ष पुरुषोत्तम घोगरे, सोशल मिडीया राज्य प्रमुख भाऊसाहेब कळसकर भाऊसाहेब कळसकर, उपाध्यक्ष बाळासाहेब म्हस्के, राज्य कार्याध्यक्ष माधवराव गंभीरे, राज्य सल्लागार हनुमान सुर्वे, संघटक आण्णासाहेब जाधव,कोअरकमिटी अध्यक्ष पंजाबराव चव्हाण, मानद अध्यक्ष चंद्रकांत बधाले,
सरपंच माझा चॅनल संचालक रामनाथ बोराडे, संपर्क प्रमुख राहुल उके महीला राज्य उपाध्यक्ष वंदना गुंजाळ, प्रसाद पाटील,भाऊसाहेब गिराम,नलिनी शेरकुरे,राज्य सचिव सुनिल रहाटे आदी पदाधिकारी यांनी विशेष परीश्रम घेतले
Tags
Maharashtra