आदर्श पत्रकार महासंघ :

महाराष्ट्रातील ग्रामीण पञकारांना प्रशासक म्हणून संधी उपलब्ध करून द्यावी -आदर्श पत्रकार महासंघ.

ग्रामपंचायतीवर महाविकास आघाडीच्या समन्वयातून प्रशासका सोबतच ग्रामीण पञकारांचा सुद्धा विचार करण्यात यावा.         आदर्श पत्रकार महासंघ.
                                                         

PRESS MEDIA LIVE :

राज्यातील अनेक जिल्ह्यातील ग्राम पंचायतीची मुदत संपत असल्याने प्रशासक नेमण्यात येणार आहे . तसेच राजकीय लोकांना ही संघी पुन्हा मिळणार असून ग्रामीण पत्रकार सुद्धा गावातील सामान्य आणि या पदास पात्र व्यक्ती आहे. ग्रामीण भागातील पत्रकाराला गावातील सर्व प्रश्नांची चांगली जाणीव असते तसेच त्याचा जनसंपर्क ही दांडगा असतो. त्यामुळे ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून ग्रामीण भागातील पत्रकार उत्तम कामगिरी करू शकतो. म्हणून पत्रकाराला प्रशासक म्हणून काम करण्याची संधी द्यावी अशी मागणी "आदर्श पत्रकार महासंघ " च्या वतीने मा. राज्यपाल व मा. मुख्यमंञी यांना करण्यात आली आहे. तसेच राज्यातील सर्व जिल्ह्यांचे पालकमंत्री , जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी ग्राम पंचायतीवर प्रशासक म्हणून त्या - त्या गावातील ( भागातील )  ग्रामीण पत्रकाराची नेमणूक करावी अशी मागणी  आदर्श पत्रकार महासंघ कडून केली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post