हातकणंगले : जिल्हा कोल्हापूर.

पोलिस व पत्रकार लोकशाहीतील  महत्वाचे  व जबाबदार घटक आहेत.


PRESS MEDIA LIVE :     हातकणंगले : 

पोलिस आणि पत्रकार हे दोन्हीही लोकशाहीतील महत्वाचे आणि जबाबदार घटक आहेत. दोघांनीही हातात हात घालून पारदर्शीपणे काम केले तर लोकशाही अधिक बळकट होऊन सर्वसामान्याचे जगणे सुसह्य होईल असे मत प्रशि. पोलिस उपअधिक्षक प्रणिल लता प्रफुल्ल गिलडा यांनी व्यक्त केले. प्रशिक्षणार्थी पोलिस उपअधिक्षक म्हणून त्यांनी हातकणंगले पोलिस ठाण्याचा नुकताच पदभार स्विकारला आहे. यानिमित्त कोल्हापूर डिस्ट्रिक्ट रिपोटर्स वेलफेअर असोशिएशनच्या पदाधिकाऱ्यांनी त्यांचे पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. यावेळी पत्रकारांशी संवाद साधताना ते बोलत होते.

यावेळी ते पुढे म्हणाले, पोलिस दलांत येऊन सर्वसामान्यांची सेवा करणे आणि गुन्हेगारीचे समूळ उच्चाटन करणे हे आपले ध्येय आहे. यासाठी सर्वसामान्य जनतेशी संपर्क कायम ठेवण्यांवर आपला भर राहील. चांगल्या गोष्टींचे आपण निश्चितच समर्थन करू मात्र अवैध धंद्याना आजिबात थारा दिला जाणार नसलयाचा इशाराही त्यांनी दिला. जिल्हा पोलिस प्रमुख अभिनव देशमुख यांनी पोलिस दलांत शिस्त आणि व्यवस्था निर्माण केली आहे. त्याच प्रमाणे तशींच शिस्तीची व्यवस्थांत आपण सदैव पणे अंमलात आणू असेही ते म्हणाले.

यावेळी संघटनेच्या वतीने पुष्पगुच्छ देऊन त्यांचे स्वागत करण्यांत आले. यावेळी संस्थापक, अध्यक्ष सुधाकर निर्मळे, कौन्सिल मेंबर अतुल मंडपे,सुरेश कांबरे, सदानंद कुलकर्णी, बाबूराव जाधव, आनंदा काशिद, सूरज पाटील, प्रशांत तोडकर, अवधूत मुसळे तौफिक मुजावर, रोहन साजणे आदी पदाधिकारी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post